• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : या दोन गोष्टींना घाबरलात तर संपलात म्हणून समजा, चाणक्य यांनी सांगितलं आयुष्यातील कटू सत्य

February 5, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी जे विचार मांडले आहेत, ते आजच्या काळातही कालबाह्य वाटत नाहीत, उलट चाणक्य यांनी जे विचार आपल्या या ग्रंथामध्ये मांडले आहेत, ते माणसाला विचार करण्यास प्रवृत्त करतात. चाणक्य म्हणतात जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणसाच्या आयुष्यात अनेक अडचणी येत असतात, काही संकटं तर अशी असतात की ज्यामुळे माणूस पूर्णपणे कोलमडून जातो, खचतो. पण लक्षात ठेवा संकट कितीही मोठं असू द्या, तुम्ही त्यावर संयमानं मात करू शकता. कोणतीही वेळ ही बसून राहत नाही, त्यामुळे जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ असते, तेव्हा अशा स्थितीमध्ये घाबरून जाऊ नका, तर शांत मनाने त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला यश नक्की मिळेल. मात्र संकटाच्या काळात जर तुम्ही खचलात, तर तुमची कोणीही मदत करू शकणार नाही. जगात अशा दोन गोष्टी आहेत, ज्या मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहेत, त्यांना कधीही घाबरू नका, जर तुम्ही या दोन गोष्टींना घाबरलात तर तुम्ही संपलात असं समजा, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आयुष्यातील बदल – आर्य चाणक्य म्हणतात बदल हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे, तुम्ही जन्माला आला तेव्हा अगदी लहान बाळ असतात, तेव्हा तुमच्या गरजा या वेगळ्या असतात, त्यानंतर तुमचं शिक्षण सुरू होतं, त्यानंतर तुम्ही तरुण होता, रोजगाराचा शोध घेतात. आधी तुमची जबाबदारी ही तुमच्या आई-वडिलांवर असते, मात्र कालांतराने तुमच्या आई -वडिलांची जबाबदारी ही तुमच्यावर येते. तुमच्या बायको आणि मुलांची जबाबदारी देखील तुमच्यावर असते, असे बदल आयुष्यात मरेपर्यंत सुरू असतात. या बदलांना सहज स्विकारता आलं पाहिजे, जर तुम्ही या बदलांमुळे गोंधळून गेलात तर तुम्ही आयुष्यात काहीही करू शकणार नाहीत, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

संघर्ष – चाणक्य म्हणतात जो जन्माला आला त्याला संघर्ष हा करावाच लागणार आहे, प्रत्येकासाठी संघर्षाची व्याख्या भलेही वेगवेगळी असेल मात्र संघर्ष हा करावाच लागतो. या जगात कोणतीही गोष्ट ही फुकट मिळत नाही, त्यासाठी तिची किंमत मोजावी लागते, त्यामुळे आयुष्यात कधीही संघर्षाला घाबरू नका, संघर्ष अटळ आहे, त्यामुळे त्याच्याशी दोन हात करा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मी माफी मागणार नाही, कुणाल कामराने दिला बाळासाहेब ठाकरेंचा दाखला, नेमकं काय घडलं?
  • Maharashtra Weather Updates : आज दुपारी घरातच थांबा, 12 ते 4…, राज्यात आजपासून सुरू होणार उष्णतेचं टॉर्चर
  • इराणने मारली बाजी! ट्रम्प यांच्या एका पोस्टमुळे मोठे नुकसान, नेमकं काय घडलं?
  • Horoscope Today 12th April 2026 : रविवारी मिळणारी नशीबाची साथ, या 3 राशींना आज मिळणार तगडा फायदा, वाचा आजचं भविष्य
  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in