• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : या ठिकाणी आयुष्यात कधीच जाऊ नका, उद्ध्वस्त व्हाल, चाणक्य काय म्हणतात?

February 4, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्या आजही कालबाह्य वाटत नाहीत, त्या अनेकांना आपलं जीवन जगण्यासाठी प्रेरणा देतात, तसेच माणसानं समाजात कसं वागावं? कुठल्या परिस्थितीमध्ये कोणते निर्णय घ्यावेत? याचं भान देखील चाणक्यांच्या या विचारांमुळे निर्माण होण्यास मदत होते. आर्य चाणक्य यांनी मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच पैलूंवर या ग्रंथामध्ये लिखाण केलं आहे. चाणक्य म्हणतात जगात अशा काही जागा असतात जिथे जाणं माणसानं कोणत्याही परिस्थितीमध्ये टाळलं पाहिजे, अपघातानं देखील अशा ठिकाणी जाता कामा नये, तुम्ही जेव्हा अशा ठिकाणी जाता, तेव्हा तुमचा संसार उद्ध्वस्त होतो. समाजातील मान-सन्मान तुम्ही गमावून बसता, तसेच तुम्ही एका फार मोठ्या संकटात सापडता, त्यामुळे अशा ठिकाणी जाणं हे टाळलंच पाहिजे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

जिथे आपलं कुणीही नाही – चाणक्य म्हणतात कधीही परक्यांच्या भूमिमध्ये जाऊ नये, जिथे आपलं कुणीच नाही, आपल्याला ओळखणारं कोणी नाही, अशा ठिकाणी चुकूनही जाऊ नये, कारण जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी जाता आणि एखाद्या मोठ्या संकटामध्ये सापडता, तेव्हा तिथे तुमच्या मदतीला कोणीही येणार नाही, कारण तिथे तुमचं स्वत:चं असं कोणीच नसतं. तसेच जिथे तुमची माणसं नाही, तिथे परकीय लोक हे तुमचं नुकसान देखील करू शकतात, तुमच्यावर हल्ला देखील करू शकतात, प्रसंगी तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो, त्यामुळे अशा ठिकाणी कधीच जाऊ नये.

अपमान – चाणक्य म्हणतात जिथे तुमचा वारंवार अपमान होतो, अशा जागी पुन्हा कधीही जाऊ नये, कारण जर तुमचा वारंवार अपमान होत असेल तर त्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो, आणि ज्या माणसाचा आत्मविश्वास कमी आहे, असा माणूस त्याच्या आयुष्यात काहीही करू शकत नाही, त्यामुळे जिथे तुमचा अपमान होतो, किंवा जाणून बुजून करण्यात येतो, अशा ठिकाणी चुकूनही पाऊल ठेवू नका, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

रोजगार – चाणक्य म्हणतात ज्या जागेवर रोजगाराच्या संधीच नाही, अशा ठिकाणी चुकूनही जाण्याचं धाडस करू नका, कारण जिथे रोजगार उपलब्ध नाही, जिथे तुमच्या मेहनतीचं, तुमच्याकडे असलेल्या कौशल्याचा योग्य मोबदला मिळणार नाही, अशा ठिकाणी जर तुम्ही गेलात तर तुमच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते, त्यामुळे अशा ठिकाणी जाऊ नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Gold Purchase : भारतावर सोन खरेदीत या दोन देशांची मात, तेच रशियावर आली सोनं विकण्याची वेळ
  • युद्ध संपताच इराणची मोठी खेळी, पाकिस्तान पाहतच राहिला, चीनला जबर शॉक, भारताला थेट…
  • LPG booking rules: एलपीजी सिलिंडर बुकिंगमध्ये मोठा बदल; सरकारकडून ग्राहकांना इशारा, eKYC अनिवार्य
  • Ashok Kharat: अशोक खरात याचा जीव घाबराघुबरा, सर्व यंत्रणाच मागे लागल्या, ती मोठी अपडेट काय?
  • लग्नाआधी नवरीला बोलावलेलं, अशोक खरातचं आतापर्यंतच सर्वात घाणेरडं सत्य समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in