• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : या चार प्रकारच्या लोकांना कधीच घरी बोलावू नका, पश्चाताप होईल

March 6, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, तसेच ते कुटनीतीतज्ज्ञ देखील होते. त्यांनी आपल्या कुटनीतीच्या बळावर धनानंद सारख्या बलाढ्य राजाचा पराभव केला, आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केलं. त्यामुळे आजही अनेक ठिकाणी आपल्याला चाणक्य नीतीमधील अनेक उदाहरणं दिली जातात. चाणक्य यांचे विचार आजच्या परिस्थितीमध्ये देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात या समाजात भिन्न भिन्न स्वभावाचे लोक राहत असतात. सर्वच लोक काही वाईट नसतात, परंतु जे लोक वाईट असतात त्यांच्यापासून तुम्हाला धोका होऊ शकतो. समाजात असे काही लोक असतात त्यांच्यापासून चार हात दूर राहण्यातच तुमचं हीत आहे. तसेच अशा लोकांना चुकूनही घरी बोलावलं नाही पाहिजे, असे लोक जर वारंवार तुमच्या घरी येत असतील तर आजच तुम्ही सावध झालं पाहिजे, त्यांच्यामुळे भविष्यात तुमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे अशा लोकांना कधीही घरी बोलावू नका असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

जो विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नसेल – चाणक्य म्हणतात ज्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकत नसाल, ज्या व्यक्तीला पहाताच तुमच्या मनात अविश्वासाची भावना निर्माण होते, अशा व्यक्तीला कधीही तुम्ही तुमच्या घरी बोलावू नका, कारण असा व्यक्ती कधी न कधी तुमचा विश्वासघात करेल. अशा व्यक्तीला तुम्ही घरी तर बोलावूच नका, मात्र तुमच्या मनात जर काही गुप्त योजना असतील तर अशा व्यक्तीसमोर त्या सांगू देखील नका असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

वाईट संगत – चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तींना वाईट संगत असते, जो व्यक्ती दारू पितो, जुगार खेळतो, अशा व्यक्तीला तुम्ही तुमच्या घरी कधीही बोलावू नका, कारण माणसाला चांगल्या सवयी लागण्यासाठी खूप वेळ लागतो, मात्र वाईट गोष्टी माणूस लगेच आत्मसात करतो, हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे कधीही वाईट संगत असलेल्या व्यक्तीला घरी बोलावलं नाही पाहिजे.

स्वार्थी लोक – चाणक्य म्हणतात जे लोक हे स्वार्थी असतात, अशा लोकांसोबत कधीही मैत्री केली नाही पाहिजे, त्यांना कधीही घरी बोलावू नका, ते त्यांच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहावं.

नकारात्मक विचार – चाणक्य म्हणतात जे लोक नेहमी नकारात्मक विचार करतात, अशा लोकांना कधीही घरी बोलावू नका. कारण त्यांच्या नकारात्मककेचा परिणाम हा तुमच्यावरही होऊ शकतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सहलीला गेली अन् घात झाला, 15 वर्षांच्या मुलीचा दरीत सापडला मृतदेह, पालकांनो ‘या’ 5 चुका टाळा
  • लिंगपिसाट खरातचा एपस्टिन होणार? करुणा मुंडे यांच्या विधानाने खळबळ; काय केली मागणी?
  • Vaibhav Suraywanshi: वैभव सूर्यवंशीची तुफान खेळी पाहून विराट कोहलीही दंग! सामना संपल्यानंतर केले असे काही की…
  • टोयोटाचा धमाका! अवघ्या 40 महिन्यांत विकल्या गेल्या 2 लाख गाड्या, ‘या’ 7 सीटर कारने उडवली झोप, किंमत फक्त..
  • छगन भुजबळ अपघातातून थोडक्यात बचावले, पायलटची मोठी चूक, हेलिकॉप्टर हेलिपॅडवर लँड न करता…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in