• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : या गोष्टी तुम्हाला क्षणिक सुख देतात, मात्र नंतर आयुष्यभर पश्चातापाची वेळ येते

March 22, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहीला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात, माणसाच्या आयुष्यात जशी सुख येतात, तशी दु:ख देखील येतात. परंतु माणूस सुखात अत्यंत आनंदीत होतो, आणि दु:खात कोलमडून जातो. निराश होतो. परंतु सुख असो अथवा दु:ख दोन्ही स्थितीमध्ये माणसाने संयम ठेवला पाहिजे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही मनाशी एक खूणगाठ बांधली पाहिजे की ही वेळ देखील निघून जाणार आहे. त्यानंतर तुमच्यावर किती दु:खाचा प्रसंग येऊ द्या, तुम्ही त्यातून नक्की मार्ग काढाल. तसेच आनंदाच्या क्षणी देखील संयम ठेवण्यास शिकाल. आर्य चाणक्य पुढे असं देखील म्हणतात की अशा काही -काही गोष्टी असतात ज्या आपल्याला क्षणिक आनंद देतात. मात्र त्यानंतर आपल्यावर आयुष्यभर पश्चातापाची वेळ येते. चला तर मग जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्या बद्दल.

स्वार्थी व्यक्तीकडून मदत – चाणक्य म्हणतात समाजात असे काही लोक असतात जे अत्यंत स्वार्थी असतात. त्यांना दिवस रात्र आपल्या स्वार्थाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. असे लोक आपल्या स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही स्थराला जाऊ शकतात. आपल्याला देखील अशा लोकांकडून कधी मदतीची अपेक्षा नसते. मात्र जेव्हा असे लोक अनपेक्षितपणे आपली मदत करतात, तेव्हा आपल्याला काही काळ बरं वाटतं. मात्र नंतर आपल्याला कळतं की या मदतीमागे देखील या व्यक्तीचा स्वार्थ होता. तेव्हा आपल्याला पश्चाताप होतो. मात्र तेव्हा आपण काहीच करू शकत नाहीत, असं चाणक् यांनी म्हटलं आहे.

दृष्ट व्यक्तीवर प्रेम – चाणक्य म्हणतात जगात प्रेम ही सर्वात सुंदर भावना आहे. मात्र ते जर योग्य व्यक्तीवर झालं, तर आपल्याला जिवंतपणीच स्वर्गाची अनुभुती मिळते. मात्र जर आपण एखाद्या चुकीच्या व्यक्तीर प्रेम केलं तर आपल्याला काही क्षण आनंद होतो. मात्र त्यानंतर आयुष्यभर आपल्यावर पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहिलं पाहिजे असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • SBI च्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! महत्त्वाची सेवा बंद राहणार, 52 कोटी ग्राहकांना फटका
  • भारतीयांच्या घरात सोने नेमके आहे तरी किती ? जगातील 10 सेंट्रल बँकांच्या सोन्याहून जास्त
  • भारतावरचं मोठं संकट टळलं, रशियाकडून भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी भेट, पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा
  • RR vs RCB : लावा ताकद, आरसीबीच्या मॅचविनर बॉलरची एन्ट्री, राजस्थान हॅट्रिकपासून रोखणार?
  • GK : टरबूज लाल आणि गोड आहे हे कसं ओळखायचं? फक्त ही ट्रिक वापरा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in