• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : प्रत्येक गोष्टीत अपयश येतंय? चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवा यश नक्की मिळणार

March 16, 2026 by admin Leave a Comment


चाणक्य हे त्या काळातील एक महान विचारवंत होते. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चांगले, वाईट अनुभव घेतले. त्यांना देखील अनेकदा आपल्या आयुष्यात पराभवाचा सामना करावा लागला, आणि त्यानंतर त्यांचा विजय देखील झाला. चाणक्य यांना जे काही अनुभव आले, त्या अनुभवाचं सार त्यांनी चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मांडलं आहे. हा ग्रंथ आज 21 व्या शतकात देखील अनेकांना मार्गदर्शक ठरतो. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की माणसाच्या आयुष्यात अनेकदा असे कठीण प्रसंग येतात की, त्यावेळी नेमकं काय करावं हे त्याला कळत नाही, तो निराश होतो. हा व्यक्तीच्या आयुष्यातील असा काळ असतो, ज्या काळात प्रत्येक ठिकाणी त्याचा पराभव होतं असतो. मात्र अशा कठीण काळावर देखील तुम्ही मात करू शकता. मात्र त्यासाठी तुमच्याकडे काही गुण असणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

संयम –चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीकडे संयम असतो, तो व्यक्ती संपूर्ण जग जिंकण्याची ताकद ठेवतो. जेव्हा तुम्हाला एखाद्या कामात वारंवार अपयश येत आहे, तर अशावेळी खचून जाऊ नका, आणि ते कामही अर्धवट सोडू नका. फक्त एकच गोष्ट करा संयम ठेवा आणि योग्य वेळेची वाट पहा. योग्य वेळ येताच पुन्हा नव्या जोमाने ते काम करा तुम्हाला यश नक्की मिळणार. मात्र त्यासाठी तुमच्याकडे संयम नावाची गोष्ट असणं गरजेच आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

सावध रहा – चाणक्य म्हणतात माणसाने नेहमी सावध असलं पाहिजे, तुमच्या आयुष्यात भविष्यात कधी कोणता प्रसंग येईल? हे तुम्ही सांगू शकत नाहीत. त्यामुळे जर समजा एखादा वाईट प्रसंग आलाच तर त्यासाठी तुम्ही नेहमी तयार राहिला पाहिजे. तसेच असे प्रसंग आयुष्यात येऊच नये यासाठी सतर्क असणं देखील तेवढंच गरजेच आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in