• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : प्रत्येक आई -वडिलांना या गोष्टी माहिती हव्याच, चाणक्य काय सांगतात?

March 26, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी आदर्श आई -वडील कसे असावेत? आई वडिलांचं आपल्या पाल्यांप्रति काय कर्तव्य आहेत? आदर्श आई -वडील कोणाला म्हणावं? मुलांवर आई-वडिलांनी संस्कार कसे करावेत? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य मुलांच्या जीवनातील आई-वडिलांचं महत्त्व सांगताना म्हणतात जेव्हा मुलं जन्माला येत तेव्हा त्यासाठी त्याचे आई्-वडील हेच त्याच्यासाठी संपूर्ण जग असतं. आई -वडील आपल्या मुलांवर कसे संस्कार करतात? ते त्यांचं संगोपन कशापद्धतीने करतात यावरच त्या मुलाच्या आयुष्याचा भविष्यातील डोलारा उभा राहत असतो. त्यामुळे जर आई -वडील आपल्या कर्तव्यात चुकले तर मुलांचं त्यांच्या आयुष्यात फार मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आई वडिलांनी आपल्या मुलांचं संगोपन करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आई वडिलांची कर्तव्य – चाणक्य चाणक्य नीतीमध्ये म्हणतात की मुलांवर चांगले संस्कार करणं, त्यांच्या मनात श्रमप्रतिष्ठेची भावना रूजवणं आणि त्यांना त्यांच्या भविष्यासाठी चांगलं शिक्षण देणं ही आई-वडिलांची सर्वात मोठी कर्तव्य आहेत. जर आई वडिलांनी आपल्या या कर्तव्याचं प्रामाणिकपणे पालन केल तर अशी मुलं आयुष्यात यशस्वी होतात. मात्र जर आई वडिलांनी आपल्या कर्तव्यांचं पालन केलं नाही, तर मुलं चुकीच्या मार्गावर जाण्याची शक्यता अधिक असते, त्याची भविष्यात मुलांसोबतच त्यांच्या आई-वडिलांना देखील फार मोठी किंमत मोजावी लागू शकते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

असे आई -वडील असतात शत्रू – चाणक्य पुढे म्हणतात. जे आईवडील आपल्या मुलांना चांगले शिक्षण देत नाहीत, त्यांच्यावर चांगले संस्कार करत नाहीत, मुलांना जगण्याचा दृष्टीकोन देत नाहीत, असे आई वडील आपल्याच मुलांचं फार मोठं नकसान कत असतात. त्यामुळे असे आई-वडील हे आपल्या मुलांचे शत्रू असतात. तसेच जे आई-वडील आपल्या मुलांना संघर्ष करायला शिकवत नाहीत. त्यांना सर्व गोष्टी आयत्या देतात असे आई वडील देखील नकळत आपल्या मुलांचं फार मोठं नुकसान करत असतात, असं देखील चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘धुरंधर 2’बद्दल दीपिकाच्या कमेंटवरून नवा वाद; अभिनेत्रीने सुनावलं ‘यात कसला मोठेपणा..’
  • शेवटचा स्वीकार करायलाच हवा…, अर्जुन कपूर याच्याबद्दल मोठी अपडेट, चाहत्यांना सतावतेय चिंता
  • Nashik Crime : वेषांतर करून आल्या, देश हादरवणाऱ्या सेक्स रॅकेटचा फाडला बुरखा! आयटी कंपनीत काय घडलं ?
  • ठाकरेंचे खासदार खरंच फुटणार का? श्रीकांत शिंदे स्पष्टच बोलले
  • वारंवार लघवीला जात आहात? अत्यंत गंभीर आजाराचे लक्ष, थेट..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in