• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : तुमच्याकडेही असतील हे 2 गुण तर लोक तुमचा गैरफायदा घेणारच, चाणक्य यांनी काय सांगितलंय?

March 22, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील उपयोगाच्या आहेत. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये माणसाचा स्वभाव कसा असावा आणि समाजामध्ये वावरताना इतरांसोबत व्यवहार कसा करावा? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात या समाजात दोन प्रकारचे लोक असतात, एक जे अत्यंत स्वार्थी असतात. दुसरे जे अत्यंत प्रेमळ आणि निस्वार्थ भावनेनं काम करणारे असतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा या जगात जे लोक स्वार्थी आहेत, ते लोक सर्वसामान्य लोकांना लुटण्याचं काम करतात. ते आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जावू शकतात, त्यामुळे अशा लोकांपासून मानसाने नेहमी सावध राहिलं पाहिजे असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

चाणक्य पुढे म्हणतात मानसाने नेहमी निस्वार्थ असावं, इतरांच्या मदतीला धावून जावं. मात्र जे लोक आपल्या स्वभावाचा गैरफायदा घेतात अशा लोकांपासून नेहमी सावध राहावं. माणूस हा कधीच सरळ मार्गी असू नये. जर तुमचा स्वभाव हा सरळमार्गी असेल, कोणताही विचार न करता समोरच्या व्यक्तीची मदत करण्याचा स्वभाव तुमचा असेल तर लोक तुमचा गैर फायदा घेतील. ज्यामुळे भविष्यात तुमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं.

हे पटून देण्यासाठी चाणक्य यांनी एक उदाहरण देखील दिलं आहे. चाणक्य म्हणतात की जी सरळ झाडं असतात त्याचे फायदे अनेक असतात. त्यामुळे जंगलातील अशीच झाडं सर्वात आधी कापली जातात. मात्र जी झाडं वाकडी असतात ती झाडं वर्षानुवर्ष टिकून असतात. कारण त्यांना कोणी कापत नाही. त्यामुळे माणसानं कधीही सरळ मार्गी असू नये, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. तसेच माणसानं जशासतसं वागावं,जर एखादा व्यक्ती तुमच्यासोबत चांगला वागला तर तुम्ही देखील त्याच्याशी चांगलं वागा, आणि जर एखादा तुमची फसवणूक करत असेल तर त्याला धडा शिकवा, असा सल्ला देखील चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दर आठवड्याला ८० हजार लोक एलपीजी ते पीएनजीमध्ये कन्व्हर्ट, तीन महिन्यांचा तो नियम काय ?
  • Chanakya Niti : या तीन गोष्टी आहेत माणसाच्या सर्वात मोठ्या शत्रू, हळुहळु व्यक्तीला संपवून टाकतात
  • Vastu Shastra : तुम्हाला वारंवार नजर लागते? मग घरातून बाहेर पडताना सतत सोबत ठेवा या तीन वस्तू
  • PBKS vs SRH : सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स भिडणार, हेड टू हेड आकडेवारी जाणून घ्या
  • Vastu Shastra : तांदूळ, हळद आणि दिव्याचे हे सोपे उपाय तुमच्या घरात आणतील सुख, शांती; सर्व समस्या होतील दूर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in