• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : ज्यांच्या खिशात पैसा असतो, त्यांच्याकडेच असतात या चार गोष्टी

March 22, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, कुटनीतीतज्ज्ञ होते, सोबतच ते एक मोठे अर्थतज्ज्ञ देखील होते. त्यामुळे मानसाने आपल्या आयुष्यात पैशांचं नियोजन कसं करावं? पैसा हा मानसाच्या आयुष्यात किती महत्त्वाचा असतो, याबाबत चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात माणसाने कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या आयुष्यात पैशांची बचत ही केलीच पाहिजे. जर तुम्ही महिन्याला शंभर रुपये कमावत असाल तर त्यातील 25 रुपये ही तुम्ही बचत केली पाहिजे. पुढे बोलताना त्यांनी असं देखील म्हटलं आहे की, या जगात व्यक्ती पैशांनी काहीही खरेदी करू शकतो. जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुमच्यावर कोणंतही संकट येत नाही, आणि जर संकट आलंच तर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या पैशांच्या जोरावर या संकटाचा सहज सामना करू शकतात.

त्यामुळे प्रत्येकाने पैशांची बचत ही केलीच पाहिजे. एक गोष्ट लक्ष ठेवा पैसा ही तुमच्या वृ्द्धत्वाची काठी असते, जर तुमच्या म्हातारपणात तुमच्याकडे पैसे असतील तर तुमचा सांभाळ कोणीही करतं, मात्र जर पैसे नसतील तर मात्र तुम्ही अडचणीत सापडू शकतात, असंही यावेळी चाणक्य यांनी म्हटलं आहे. चाणक्य म्हणतात ज्याच्या खिशात पैसा असतो, त्याच्याकडे चार गोष्टी असल्याचं पहायला मिळतं. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

मित्र – चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीकडे पैसा असतो, त्या व्यक्तीला मित्र देखील खूप असतात. मात्र गरिबाला कोणीही मित्र नसतो. अनेकजण हे त्या व्यक्तीशी मैत्री करत नाहीत, तर त्याच्याकडे असलेल्या पैशांसोबत मैत्री करतात. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहावं असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

शत्रू – चाणक्य म्हणतात जसा मित्र हा श्रीमंत माणसांनाच असतो, तसाच शत्रू देखील श्रीमंत माणसांचेच अधिक असतात. एखाद्या गरीब व्यक्तीचा कोणीही शत्रू नसतो. मात्र लोक श्रीमंत माणसांच्या श्रीमंतीचा मत्सर करतात आणि त्यातून शत्रू निर्माण होतात.

नातेवाईक -चाणक्य म्हणतात ज्याच्याकडे पैसा आहे, त्याचेच नातेवाईक असतात. जर तुमची परिस्थिती गरीब असेल तर तुमच्या कितीही जवळचा नातेवाईक असू द्या, तो तुम्हाला साधी ओळख देखील दाखवणार नाही. मात्र हेच जर तुमच्याकडे पैसा असेल तर कितीही दूरचा नातेवाईक असू द्या, तो तुमच्याशी ओळख दाखवण्याचा प्रयत्न करेल, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

प्रसिद्धी – चाणक्य म्हणतात ज्यांच्याकडे पैसा असतो, अशाच लोकांना प्रसिद्ध मिळते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हुंडईचा मोठा धमाका! ग्रँड i10 निओसचे नवीन मॉडेल लाँच, किंमत किती?
  • स्कोडाची ऑफर, कार खरेदीवर तब्बल 3.5 लाखांची भरघोस सूट
  • अमरनाथ यात्रेला जात असाल तर तुमच्या बॅग पॅकिंगमध्ये या वस्तू नक्की ठेवा, वाचा यादी
  • इस्त्रायल हादरलं, युद्धविरामानंतर पहिल्यांदाच सर्वात मोठा हल्ला, थेट…, युद्ध पुन्हा पेटणार? जगभरात मोठी खळबळ
  • नव्या Flying Flea C6 इलेक्ट्रिक बाईकसाठी किती EMI बसेल? ‘हे’ गणित जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in