• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : जो व्यक्ती या चार गोष्टींच्या बाबतीत सावधान असतो, तो आयुष्यात यशस्वी होतो

March 7, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, चाणक्य हे एक कुटनीतीतज्ज्ञ होते. माणसाचा व्यवहार कोणासोबत कसा असावा? याबाद्दल चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात माणसाचं आयुष्य हे खाच खळग्यांनी भरलेलं असतं. कधी आयुष्यात दु:ख वाट्याला येतं तर कधी सुख. मात्र परिस्थिती कशीही असो माणसानं संयम ठेवला पाहिजे. ज्याच्याकडे संयम आहे, अशा व्यक्तीचा आयुष्यात कधीही पराभव होत नाही. पुढे चाणक्य यांनी असंही म्हटलं आहे की, काही गोष्टी अशा असतात ज्यांच्यापासून माणसानं कायम सावध राहिलं पाहिजे, जर तुम्ही या गोष्टींपासून सावध राहिलात तर आयुष्यात तुम्ही कधीही पराभवाचं तोंड पहाणार नाहीत, मात्र जर तुम्ही बेसावध राहिलात तर मात्र तुम्ही अडचणीत सापडू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? आणि या चार गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत? त्याबद्दल.

पाऊल – चाणक्य म्हणतात माणसानं प्रत्येक पाऊल हे विचारपूर्वकच टाकलं पाहिजे, नीट पाहून टाकलं पाहिजे. मग तुम्ही रस्त्यावर चालत असाल तरी देखील आणि आयुष्याच्या वाटेवर चालत असाल तरी सुद्धा. तुमचं प्रत्येक पाऊल हे विचारपूर्वकच पडलं पाहिजे. जर तुम्ही रस्त्याने चालला आहात आणि समजा तुमचं रस्त्याकडे लक्ष नाही, तर वाटेत एखादा मोठा खड्डा येऊ शकतो, त्यात तुम्ही पडू शकता, किंवा समोर एखादा मोठा दगड आला तर तुम्हाला ठेच लागण्याची शक्यता असते, त्यामुळे तुमचं प्रत्येक पाऊल हे विचारपूर्वक पडलं पाहिजे. तसचं आयुष्याचं देखील आहे, जर आयुष्यात तुमचं एखादं जरी चुकीचं पाऊल पडलं तर तुमचं संपूर्ण आयुष्य बरबाद होऊ शकतं, त्यामुळे माणसानं आपलं प्रत्येक पाऊल हे विचारपूर्वक टाकलं पाहिजे असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

विचार करून बोला – चाणक्य म्हणतात तुमची जीभ ही दुधारी तलवार आहे, तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीशी बोलता तेव्हा आधी त्याच्यासोबत काय बोलायचं आहे? याचा विचार करा. एक गोष्ट लक्षात ठेवा आधी बोलून नंतर विचार करण्यापेक्षा आधी विचार करून बोललेलं कधीही उत्तम, त्यामुळे समोरचा माणूस दुखवला जात नाही.

या लोकांपासून सावध रहा – चाणक्य म्हणतात आपण नेहमी धूर्त, स्वार्थी लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. कारण त्यांच्यामुळे आपल्याला धोका होऊ शकतो.

पैशांचं नियोजन – चाणक्य म्हणतात जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला पैशांचं नियोजन हे जमलंच पाहिजे, तुम्ही जर भविष्यासाठी पैशांचं नियोजन केलं तर आयुष्यात यशस्वी व्हाल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Girija Oak : ‘नॅशनल क्रश’च्या टॅगचा गिरिजा ओकला बसलाय मोठा फटका, तिच्यासोबत नेमकं घडतंय तरी काय?
  • Sharad Pawar : वारकरी संप्रदायात प्रतिगाम्यांची घुसखोरी; शरद पवार यांनी तुतारी फुंकली, आता थेट प्रहार? प्लॅनच सांगितला
  • tv9 Marathi Special Report | बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात, सुळेंचे सूचक वक्तव्य चर्चेत
  • Monalisa Bhosale: मोनालिसा भोसलेच्या लग्नात मोठा ट्विस्ट, महिनाभरातच नवरा फरमान जाणार तुरुंगात?
  • Supriya Sule: अजितदादांचा फोन सापडला पण… सुप्रिया सुळेंचा संताप, त्या वक्तव्याची मोठी चर्चा, तपास यंत्रणा अडचणीत?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in