• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : जर तुम्हाला तुमचा पराभव समोर दिसत असेल, तर ही एक चूक कधीच करू नका

March 6, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी जे विचार मांडले आहेत, ते आजच्या काळातही कालबाह्य न वाटता उपयोगी वाटतात. चाणक्य म्हणतात अनेकदा आपल्या समोर अशी परिस्थिती असते, की आपल्याला संकटांनी चारही बाजुने घेरलेलं असतं. आपण एका संकटातून मार्ग काढतो, तोपर्यंत दुसरं संकट आपल्या समोर उभंच असतं, अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करावं हे आपल्याला कळत नाही. अनेकदा आपला शत्रू आपल्या पेक्षा बलवान असतो. मग अशा परिस्थितीमध्ये त्याच्याशी कसं लढावं असा प्रश्न देखील आपल्या मनाला पडतो. तर अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे तुमचं धैर्य. जर तुम्ही अशा बिकट परिस्थितीमध्ये खचला नाहीत, तर जगातील कोणतीही शक्ती तुमचा पराभव करू शकत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमका काय सल्ला दिला आहे? त्याबद्दल.

शत्रू बलवान असेल तर – चाणक्य म्हणतता जर तुमचा शत्रू हा तुमच्यापेक्षा अधिक बलवान असेल तर अशा परिस्थितीमध्ये खचून जाऊ नका. लक्षात ठेवा तुम्ही जर संयम ठेवलात तर तुम्ही आर्धी लढाई जिकलात म्हणून समजा. जर तुमचा शत्रू हा तुमच्यापेक्षा अधिक बलवान असेल तर त्याच्यासमोर ताकदीचा प्रयोग करण्याची चूक कधीही करू नका, त्यामुळे तुमचा पराभव होऊ शकतो, तर त्याला बुद्धीच्या जोरावर हरवा. मात्र त्यासाठी तुमच्या कडे संयम असणं गरजेचं आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

दरम्यान जर तुम्हाला तुमच्या समोर पराभव दिसत असेल तर अशावेळी कधिही खचून जाऊ नका.  तुम्ही जर हार मानली जर नक्कीच तुमचा पराभव होऊ शकतो. त्यामुळे कधीही पराभव समोर दिसत असाताना हार माणून नका, तुम्ही पराभवातून देखील यश मिळू शकता, संकटाच्या काळात फक्त शांत राहा आणि परिस्थितीचं अवलोकन करा असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Girija Oak : ‘नॅशनल क्रश’च्या टॅगचा गिरिजा ओकला बसलाय मोठा फटका, तिच्यासोबत नेमकं घडतंय तरी काय?
  • Sharad Pawar : वारकरी संप्रदायात प्रतिगाम्यांची घुसखोरी; शरद पवार यांनी तुतारी फुंकली, आता थेट प्रहार? प्लॅनच सांगितला
  • tv9 Marathi Special Report | बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात, सुळेंचे सूचक वक्तव्य चर्चेत
  • Monalisa Bhosale: मोनालिसा भोसलेच्या लग्नात मोठा ट्विस्ट, महिनाभरातच नवरा फरमान जाणार तुरुंगात?
  • Supriya Sule: अजितदादांचा फोन सापडला पण… सुप्रिया सुळेंचा संताप, त्या वक्तव्याची मोठी चर्चा, तपास यंत्रणा अडचणीत?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in