• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : आयुष्यातील 3 असे प्रसंग जेव्हा खऱ्या मित्रांची ओळख होते, चाणक्य काय सांगतात?

April 9, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की हे जग स्वार्थाचा बाजार आहे. जर एखाद्या व्यक्तीला तुमच्याशी मैत्री करण्यात किंवा तुमच्याशी जवळीकता वाढवण्यात काही स्वार्थ दिसत असेल तर असा व्यक्ती तुमच्याशी मैत्री करतो. मात्र जेव्हा त्याचा स्वार्थ साधला जातो, तेव्हा तो तुम्हाला सोडून जातो. अशा व्यक्तींमुळे अनेकदा तुमच्यावर पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे तुम्हाला आपले खरे हितचिंतक कोण आहेत आणि केवळ स्वार्थासाठी आपल्या जवळ कोण आले आहेत? हे ओळखता आलं पाहिजे. पुढे चाणक्य असंही म्हणतात की अनेक नाते देखील अशी असतात, जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते, आपण संकटात सापडतो, तेव्हा ते आपली साथ सोडून निघून जातात. प्रत्येकाच्या आयुष्यात असे तीन प्रसंग येतात, जेव्हा तुम्हाला तुमचा खरा मित्र कोण आणि तुमचा शत्रू कोण याची जाणीव होते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

संकटाचा काळ – चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात की जेव्हा तुम्ही एखाद्या फार मोठ्या संकटामध्ये फसलेले असतात. अशावेळी तुम्हाला मदतीची गरज असते. तेव्हा जो पळून न जाता ठामपणे तुमच्या पाठीशी उभा राहून तुमची मदत करेल तोच तुमचा खरा मित्र. जे लोक संकटाच्या काळात तुमच्यापासून दूरवतात असे सर्व लोक स्वार्थी असतात.

आर्थिक गरज – चाणक्य म्हणतात आयुष्यात तुम्हाला अनेकदा आर्थिक गरज लागते, तुमच्याकडे पैसे नसतात अशा वेळी तुमच्या मदतीला जो धावून येतो ते तुमचा खरा मित्र. खरा मित्र कोणत्याही संकटाच्या काळात आपल्या मित्राचा हात सोडत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

आजारपण – चाणक्य म्हणतात तुम्ही खूप आजारी आहात, अशावेळी तुम्हाला लोकांच्या आधाराची गरज असते, अशा काळात जो व्यक्ती तुमची मदत करतो तोच तुमचा खरा मित्र. एक गोष्ट लक्षात ठेवा जो व्यक्ती तुमच्या संकट काळात, आर्थिक गरजेला आणि आजारपणात धावून येतो तोच तुमचा खरा मित्र असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Char Dham Yatra 2026: चार धाम यात्रा ‘या’ दिवसापासून सुरू, घरबसल्या असे करा रजिस्ट्रेशन, पाहा मंदिरांच्या वेळा
  • हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी ही खास गोष्ट करा अर्पण, वास्तुदोष होईल दूर
  • घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी हा परफ्युम शिंपडा, वास्तु संतुलन राहणार कायम
  • RR vs RCB : राजस्थान रॉयल्स विजयी चौकारासाठी सज्ज, आरसीबीसमोर यजमांनाना रोखण्याचं आव्हान, कोण जिंकणार?
  • चाणाक्य म्हणतात, आयुष्यातील ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुमचा नाश निश्चित

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in