
चाणक्य हे एक महान विचारवंत होते, तसेच ते एक कुटनीतीतज्ज्ञ देखील होते. चाणक्य यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर आणि कुटनीतीचा वापर करून धनानंद सारख्या बलाढ्य राजाचा परभाव केला आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केलं. याच कुटनीतीबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्यातील अनेक गोष्टी आजही मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात समाजात जेवढे व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. समाजात असे काही लोक असतात, ज्यांच्यापासून सावध राहण्यातचं तुमचं हित असतं, जर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात तुमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहिलं पाहिजे, जे व्यक्ती तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात, त्यांना कसं ओळखायचं? हे सांगताना चाणक्य म्हणतात अशा व्यक्तींकडून तुम्हाला नेहमी छोटे-छोटे संकेत मिळत असतात, ते संकेत तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. चला तर जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल?
धोकादायक लोक – चाणक्य म्हणतात तुम्हाला अनेकदा असा अनुभव आला असेल की काही लोक हे अचानक तुमच्याशी खूपच गोड बोलू लागले आहेत, किंवा ते तुमच्याशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. पूर्वी जे लोक तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करत होते, आणि ते जर अचानक आता तुमच्याजवळ येत असतील, तुमच्याशी जवळीक वाढवत असतील तर समजून जा त्या व्यक्तीचा त्यामागे नक्कीच काहीतरी स्वार्थ दडलेला आहे. असे व्यक्ती त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी तुमचं नुकसान करण्यास देखील मागे -पुढे पहात नाहीत, त्यामुळे अशा व्यक्तींपासून नेहमी सावध रहावं, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. तुम्ही जर अशा व्यक्तींपासून सावध राहिलात, तर भविष्यात होणारं तुमंच नुकसान टळू शकतं.
एका गोष्टीवर ठाम न रहाणारे व्यक्ती – चाणक्य म्हणतात असे लोक देखील खूप विश्वासघातकी तसेच धोकादायक असतात. जे आपल्या एका छोट्यासा स्वार्थासाठी देखील आपला पक्ष बदलू शकतात. जर तुम्ही अशा लोकांसोबत संगत केली तर एक दिवस तुम्ही मोठ्या अडचणीत सापडाल, त्यामुळे नेहमी अशा लोकांपासून सावध रहा असा सल्ला चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Leave a Reply