• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CCTV कॅमेऱ्याची दिशा बदलली, दरवाजा, खिडकीची कडी तुटली..; निर्माता साजिद नाडियादवालाच्या बंगल्यात अज्ञातांचा प्रवेश अन्..

February 1, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माता साजिद नाडियादवालाच्या मुंबईतील अंधेरी इथल्या बंगल्यात चोरीचा प्रयत्न झाला असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वर्सोवा पोलिसांनी 30 जानेवारी रोजी अंधेरी पश्चिम इथल्या चित्रपट निर्माता साजिद नाडियादवालाच्या निवासस्थानी झालेल्या चोरीच्या प्रयत्नाप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध घरात अनधिकृत प्रवेश आणि घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीप्रमाणे नाडियादवालाचा बंगला अंधेरी पश्चिम, वर्सोवा इथं आहे. तर त्याची निर्मिती कंपनी, नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड त्याच परिसरातील वीरा देसाई रोडवर आहे.

सीसीटीव्ही कॅमेराची दिशा बदलली

तक्रारदार अखिलेश यादव हे बंगल्याची देखभाल करणं आणि कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे आणि फुटेजचे निरीक्षण करण्याची जबाबदारी सांभाळत होते. शुक्रवारी सकाळी 11 वाजता आपलं नियमित काम करत असताना यादव यांच्या लक्षात आलं की बंगल्याच्या मुख्य दरवाजाजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी एकाची दिशा बदलण्यात आली आहे. ज्यामुळे त्यांना संशय आला आणि याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांनी ताबडतोब प्रॉडक्शन मॅनेजर रामजनम दुबे यांना कळवलं आणि दोघांनीही बंगल्याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला.

दोन अज्ञातांचा प्रवेश

बंगल्याच्या आवारात पोहोचल्यावर त्यांना बंगल्याच्या दरवाजाची आणि खिडकीची कडी तुटलेली आढळली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या दिशाही बदलल्याचं आढळलं होतं. परंतु घरातून कोणतंही सामान चोरीला गेलेलं आढळून आलं नाही. अखेर जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले तेव्हा त्यांना पहाटे 3.27 ते 3.29 च्या दरम्यान दोन अज्ञात व्यक्ती बंगल्यात प्रवेश करताना दिसले. आरोपींनी कुलूप तोडून बंगल्याच्या आवारात प्रवेश करत चोरीचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी यादव यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमांखाली एफआयआर नोंदवला. घरफोडी आणि चोरीचा प्रयत्न केल्याबद्दल ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. साजिद नाडियादवाला हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माता आणि अभिनेता सलमान खानचा अत्यंत जवळचा मित्र आहे. ‘हाऊसफुल’ या चित्रपटाच्या फ्रँचाइजीसाठी तो ओळखला जातो. याशिवाय ‘बागी’, ‘किक’, ‘टू स्टेट्स’, ‘हिरोपंती’, ‘लय भारी’, ‘हायवे’, ‘तमाशा’ यांसारख्या चित्रपटांचीही त्याने निर्मिती केली आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एप्रिल 2026 मधील विवाहाच्या शुभ मुहूर्तांची जाणून घ्या ही संपूर्ण यादी
  • Maruti Alto आणि Brezza वर मोठा डिस्काउंट, जाणून घ्या नवीन किमती
  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.
  • ‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत
  • ‘या’ तारखेला साजरी होणार अक्षय्य तृतीया , पूजेचा मुहूर्त आणि सोने खरेदीची वेळ माहित्ये का ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in