अनेक राज्याच्या एकूण उत्पन्नाचा मोठा भाग, सुमारे १५ ते ३५ टक्के केवळ मद्यविक्रीतून येत असतो. याच कारणाने कोणतेही राज्यसरकार आणि दारुबंदीसारखे आर्थिक जोखीम असलेले निर्णय घेण्यापूर्वी शंभर वेळा विचार करते. काही निवडक राज्य सोडली तर इतर सर्व राज्यात दारुवर मोठा टॅक्स लावलेला असता. त्यामुळे राज्याचा खजाना दरवर्षी भरत असतो. तर तुम्हाला माहिती आहे का ? […]
india
खरच अशा विचारांचा नवरा पाहिजे, समोरुन येणारा इतका पैसा कोणी सोडला असता, पण त्याने हात जोडून सर्वांना जिंकलं
हुंडा मागणं, घेणं हा कायद्याने गुन्हा आहे. पण आजही देशाच्या काही भागात प्रथेच्या नावाखाली हुंडा दिला जातो, मागितला जातो. पण आता हुंडा प्रथेच्या विरोधात मजबूत संदेश देणारी एक घटना समोर आली आहे. एका नवरदेवाने लग्नात दिले जाणारे 31 लाख रुपये हात जोडून विनम्रतेने परत केले. या नवरदेवाचं सर्वत्र कौतुक होत आहे. उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये हे […]
आता राज्यसभेत घोषणा देण्यावरही चाप, थँक्स, जयहिंद, वंदे मातरम… नकोच; काय आहेत नवीन नियम?
संसदेचे हिवाळी अधिवेशन सत्र १ डिसेंबरपासून सुरु होत आहे. या आधीच एक नवा वाद उभा राहिला आहे. यास कारणीभूत ठरले आहे राज्यसभेने संसद सदस्यांच्या वागणूकी संदर्भात जारी केलेले एक बुलेटीन. या बुलेटीन संदर्भात टीएमसी आणि काँग्रेस सह विरोधी दलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या बुलेटीनमध्ये संसद सदस्यांना काही निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार संसद […]
Mumbai Air Pollution: मुंबईतील खराब हवेसाठी इथिओपियातील ज्वालामुखीवर खापर फोडू नका, हायकोर्टाचे प्रदूषणावरून सरकारला खडे बोल
Mumbai Bad Air: मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. मुंबईत दृश्यमानता कमी झाली आहे. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतलेली आहे. इथिओपियात ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि त्याची राख वाहत आली आहे. त्यामुळे मुंबईत हवेची गुणवत्ता खालवल्याचा दावा सरकारी पक्षाने यावेळी केला. त्यावर हायकोर्टाने सरकारचे कान टोचले. या घटनेपूर्वी शहरातील हवा खराब होती असे […]
IMD Weather Update : पुन्हा पावसाचं मोठं संकट, पुढचे 5 दिवस धोक्याचे, हवामान विभागाचा हाय अलर्ट
देशासह राज्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, अनेक राज्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. पावसामुळे अनेक राज्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. महाराष्ट्राला देखील यावर्षी पावसाचा चांगलाच तडाखा बसला, महाराष्ट्रात पावसामुळे मोठं नुकसान झालं. दरम्यान आता पुन्हा एकदा मोठी बातमी समोर येत आहे. चक्रीवादळ सेन्यारनंतर पुन्हा एकदा एक नवं चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार झालं आहे. या […]
50 Khoke Row : आता हे काय…भाजपचाच आमदार म्हणतोय, 50 खोके-ओक्के! फोडाफोडीनंतर युतीतचं भांड्याला भांडं
महाराष्ट्राच्या राजकारणात 50 खोके हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी खुद्द भाजप आमदारानेच मित्रपक्षाच्या आमदारावर हा गंभीर आरोप केल्याने महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. हिंगोलीचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, बांगर यांनी शिंदे गटात सामील होण्यासाठी 50 कोटी रुपये घेतले आहेत. […]