• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Captain : एक मालिका-3 कर्णधार, टीमवर ओढावली नामुष्की, कारण काय?

March 22, 2026 by admin Leave a Comment


न्यूझीलंड क्रिकेट टीमला आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभूत व्हावं लागलं. यजमान आणि गतविजेत्या टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत करत सलग दुसऱ्यांदा टी 20I वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. तर न्यूझीलंडला उपविजेता म्हणून पुन्हा एकदा समाधान मानावं लागलं. त्यानंतर आता न्यूझीलंड मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळत आहे. न्यूझीलंडला या मालिकेत 3 कर्णधारांसह खेळण्याची वेळ ओढावली आहे.

टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेनंतर लगेचच ही मालिका आयोजित करण्यात आली. त्यामुळे वर्कलोड मॅनेजमेंटनुसार न्यूझीलंडच्या प्रमुख खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली. तसेच मिचेल सँटनर आणि टॉम लॅथम हे दोघे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेत नेतृत्व करणार होते. मात्र टॉम लॅथमच्या दुखापतीमुळे या मालिकेत न्यूझीलंडच्या तिसर्‍या कर्णधाराची एन्ट्री झाली. त्यामुळे जेम्स निशाम याला नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी संघ जाहीर करताना मिचेल सँटनर पहिल्या 3 टी सामन्यांत नेतृत्व करणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. तसेच शेवटच्या 2 सामन्यांमध्ये टॉल लॅथम कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार असल्याचं न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सांगितलं होतं.

न्यूझीलंड सलग 2 सामन्यांत विजयी

न्यूझीलंडची या मालिकेत पराभवाने सुरुवात झाली. मात्र त्यानंतर न्यूझीलंडने सलग 2 सामना जिंकून मालिका विजयाचा दावा मजबूत केला होता.त्यामुळे टॉम लॅथम त्याच्या नेतृत्वात न्यूझीलंडला चौथ्या सामन्यासह मालिका जिंकून देणार का? याची उत्सूकता होती. मात्र टॉमला दुखापतीमुळे चौथ्या सामन्यातून बाहेर पडावं लागल. त्यामुळे ऐनवेळेस जेम्स निशाम याला कर्णधार करण्यात आलं. निशाम यासह न्यूझीलंडचं टी 20i क्रिकेटमध्ये नेतृत्व करणारा 12 वा कर्णधार ठरला.

न्यूझीलंडचा पराभव

दरम्यान न्यूझीलंडला चौथा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी होती. तर मालिकेत 1-2 ने पिछाडवर असल्याने दक्षिण आफ्रिकेवर मालिका पराभवाची टांगती तलवार होती. मात्र केशव महाराज याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने चौथ्या सामन्यात न्यूजीलंडवर मात करत मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली. आता उभयसंघातील पाचवा आणि अंतिम सामना हा 25 मार्चला होणार आहे. या सामन्यात टॉम न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे पाचव्या सामन्यासह मालिका कोण जिंकणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पाकिस्तान आपटला तोंडावर, इराणकडून सर्वात मोठा दणका, जगापुढे थेट..
  • कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळत नाही, काळजी करु नका, रेल्वेकडून मोठी गुडन्यूज
  • तर लाडकी बहीण योजना रोखावीच लागेल – उच्च न्यायालयाकडून सरकारची कानउघडणी
  • तर लाडकी बहीण योजना रोखावीच लागेल – उच्च न्यायालयाकडून सरकारची कानउघडणी
  • Maharashtra News LIVE : लवकरच ‘ऑपरेशन टायगर’? दरेगावातून एकनाथ शिंदे सक्रीय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in