• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Budget 2026: महिलांसाठी आता फ्लिपकार्टसारखं स्वत:चं पोर्टल, SHE-Mart बनणार; कशी होणार कमाई?

February 1, 2026 by admin Leave a Comment


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (रविवार, 1 फेब्रुवारी 2026) केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. ‘लखपती दीदी योजना’ ही सरकारची महिला सक्षमीकरणाची प्रमुख योजना आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेला आणखी विस्तार देण्यात आला आहे. याअंतर्गत देशभरात समुदायाच्या मालकीच्या SHE-Marts सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे महिला उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी कायमस्वरुपी बाजारपेठ मिळणार आहे. विशेष म्हणजे ग्रामी महिलांसाठी आर्थिक संधी उपलब्ध करून देणं, त्या वाढवणं आणि या योजनेचा कणा असलेल्या गटांना अधिक बळकटी देणं हे या मागचं उद्दिष्ट आहे. याव्यतिरिक्त प्रत्येक जिल्ह्यांत मुलींचं वसतीगृह उघडलं जाईल, यामुळे महिलांच्या शिक्षणाचाही स्तर वाढेल.

सेल्फ-हेल्प एंटरप्रेन्योर मार्ट्स

निर्मला सीतारमण यांनी सांगितलं की, लखपती दीदी कार्यक्रमाच्या यशावर आधारित महिला आता फक्त क्रेडिट-लिंक्ड उपजीविकेपुरत्या मर्यादित राहणार नाहीत. तर त्यांना उद्योगाचे मालक बनण्यात मदत केली जाईल. यासाठी क्लस्टर स्तरीय फेडरेशन अंतर्गत सेल्फ हेल्प (SHE) मार्ट्स स्थापन केले जातील. हे रिटेल आऊटलेट्स म्हणून काम करतील. या मार्ट्सना सुधारित आणि नाविन्यपूर्ण साधनं, त्याचसोबत वित्तपुरवठा केला जाईल.

SHE Mart कसं काम करेल?

  • ग्रामीण महिला उद्योजकांना स्वावलंबी बनवणं आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणं हे त्यामागचं उद्दिष्ट आहे.
  • यामुळे महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण होईल, भांडवल खेळतं राहील आणि क्षमता बांधणीतही मदत होईल.
  • हे एक असं व्यासपीठ असेल जिथे शेती आणि ग्रामीण भागातील महिला उद्योजक त्यांची उत्पादनं विकू शकतील.
  • SHE-Mart अंतर्गत ग्रामीण भागात महिलांकडून चालवले जाणारे स्टोअर्स सुरू केली जातील.
  • महिला उद्योजकांच्या आर्थिक विकासाला चालना देण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचं यामागचं उद्दिष्ट आहे.

लखपती दीदी म्हणजे काय?

लखपती दीदी योजना ही ग्रामीण विकास मंत्रालयाकडून राबविण्यात येते. या योजनेचं उद्दिष्ट ग्रामीण महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देऊन त्यांना सक्षम करणं आहे. या योजनेअंतर्गत बचत गटांशी संबंधित महिलांना सूक्ष्म उद्योग सुरू करण्यास मदत केली जाते. यामुळे त्यांना दरवर्षी किमान 100,000 रुपयांचं शाश्वत उत्पन्न मिळू शकतं. या योजनेअंतर्गत महिलांना शिवणकाम, प्लंबिंग, एलईडी बल्ब उत्पादनापासून ते ड्रोन ऑपरेशनपर्यंत विविध क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जातं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स, ग्राहकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी, फीचर्स, किंमत जाणून घ्या
  • KKR vs LSG Toss : लखनौचा फिल्डिंगचा निर्णय, केकेआरमध्ये मॅचविनर परतला, विजयाचं खातं उघडणार?
  • वैद्यकीय अधिकाऱ्याने पैशांसाठी सर्वच मर्यादा ओलांडल्या, डॉक्टर तरुणीसोबत नको ते केलं, शेवटी पश्चातापाची वेळ
  • बिझनेसमनशी लग्न केलं, 4 मुलांचा सांभाळ करतेय; चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • मोठी बातमी! रशियाची युरोपीयन राष्ट्रांवर मोठी कारवाई, थेट पाणबुड्या…, समुद्रात मोठा खेळ, जगाची झोप उडाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in