• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Border 2 Review: कसा आहे सनी देओलचा ‘बॉर्डर 2’? पहिला रिव्ह्यू समोर, स्टार्स पाहून व्हाल थक्क!

January 23, 2026 by admin Leave a Comment


1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’ या सुपरहिट चित्रपटाचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित सीक्वेल ‘बॉर्डर 2’ नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू समोर आला आहे. या पहिल्यावहिल्या रिव्ह्यूमध्येच ‘बॉर्डर 2’ला ब्लॉकबस्टर असं म्हटलं गेलं आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक आणि समीक्षक तरण आदर्शने सोशल मीडियावर या चित्रपटाचा रिव्ह्यू लिहिला आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी ‘बॉर्डर 2’ला 5 पैकी 4.5 स्टार दिले आहेत. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच जबरदस्त असणार, असं नेटकरी म्हणत आहेत.

तरण आदर्शने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिलं, ‘बॉर्डर 2 हा चित्रपट तुमचं हृदय अभिमानाने भरून टाकणारा आहे. हा चित्रपट देशाला तसंच सशस्त्र दलांना सलाम करतो. थिएटरमध्ये आवर्जून पहावा असा चित्रपट. दिग्दर्शक अनुराग सिंहने अत्यंत दमदार पद्धतीने आणि भावनिकदृष्ट्या ही युद्धकथा सादर केली आहे. ‘बॉर्डर’चा स्तर, प्रामाणिकपणा आणि आत्मा यात खऱ्या अर्थाने उतरला आहे. त्याचसोबत हा चित्रपट कल्ट क्लासिक ‘बॉर्डर’च्या वारशाचा आदर करतो. या चित्रपटातील साहसदृश्ये फक्त दिखाव्यासाठी नाहीत. तर कथा आणि भूमिकांच्या भावनांना पुढे नेण्यात ही दृश्ये मदत करतात.’

#OneWordReview…#Border2: OUTSTANDING.
Rating: ⭐⭐⭐⭐½
Power. Patriotism. Pride… #Border2 makes your heart swell with pride… The film salutes the nation as well as the armed forces… STRONGLY RECOMMENDED. #Border2Review

Director #AnuragSingh delivers a thunderous,… pic.twitter.com/C5Y2SgfBje

— taran adarsh (@taran_adarsh) January 22, 2026

तरण आदर्श यांनी त्यांच्या रिव्ह्यूमध्ये ‘बॉर्डर 2’मधील डायलॉग आणि संगीताचीही प्रशंसा केली आहे. ‘यातील संवाद धारदार, मनाला भिडणारे आणि देशभक्तीपूर्ण आहेत. यामध्ये असे अनेक पंचलाइन्स आहेत, ज्यांवर थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो. त्याचसोबत ‘घर कब आओगे’ आणि ‘जाते हुए लम्हों’ या दोन गाण्यांचे रिक्रिएटेड व्हर्जन डोळ्यांत पाणी आणतात. अभिनेत्यांबद्दल बोलायचं झाल्यास, सनी देओल या चित्रपटाचं हृदय आहे. तो अक्षरश: डरकाळी फोडताना दिसतोय. तर वरुण धवन हा या चित्रपटातील सर्वांत मोठा सरप्राइज ठरणार आहे. चांगलं लेखन आणि दिग्दर्शक यांच्या जोरावर वरुणने त्याची भूमिका अत्यंत चोख साकारली आहे. दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांनीसुद्धा त्यांच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे.’

‘बॉर्डर 2’ने अॅडव्हान्स बुकिंगद्वारे प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधी रुपये कमावले होते. परंतु आता माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आणखी तगडं होऊ शकतं, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यातच प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी असल्याने प्रेक्षक थिएटरमध्ये आणखी गर्दी करू शकतात.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • GK : डीप फ्रीजरचे तापमान किती असते? आकडा वाचून झोप उडेल
  • IPL 2026, KKR vs LSG: फिन एलनच्या विकेटवरून वाद! षटकार मारला पण आऊट दिलं Video
  • Vastu Shastra : तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा एका झटक्यात होईल दूर, फक्त सात दिवस करा हा सोपा उपाय
  • डास पुन्हा घरात येणारच नाहीत, 5 रुपयांच्या टोमॅटोचा करा हा सोपा उपाय, आता उन्हाळ्यात बिनधास्त खिडक्या उघड्या ठेवा
  • सूर्य-बृहस्पति दृष्टी योगामुळे या 4 राशींचा खेळ बिघडणार, आयुष्यात नेमकं काय काय घडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in