• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Bonus Share: अरे लॉटरी लागली! 5 बोनस शेअर ते पण फ्री फ्री फ्री…रेकॉर्ड डेट काय?

March 22, 2026 by admin Leave a Comment


Small Cap Company : R M Drip & Sprinklers Systems Ltd ने गुंतवणूकदारांसाठी आनंद वार्ता आणली आहे. कंपनी आपल्या शेअरहोल्डर्सला बोनस शेअरची भेट देणार आहे. कंपनी गुंतवणूकदारांना 5:7 या प्रमाणात बोनस शेअर देणार आहे. म्हणजे प्रत्येक 7 शेअर्सवर कंपनी 5 नवीन शेअर मोफत देईल

कंपनीने बोनस शेअरसाठी नवीन रेकॉर्ड डेटची घोषणा केली आहे. त्यानुसार 10 एप्रिल रोजी रेकॉर्ड डेट असेल. यापूर्वी ही तारीख 7 एप्रिल अशी होती. त्यात तीन दिवसांची भर घालण्यात आली आहे. या तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांकडे या कंपनीचे शेअर असतील. त्यांना बोनस शेअरचे गिफ्ट मिळेल.

म्हणजे या कंपनीचे 10 एप्रिलपर्यंत तुमच्याकडे जितके शेअर असतील, त्याच्या 5:7 प्रमाणात बोनस शेअरचे गिफ्ट मिळेल. म्हणजे प्रत्येक 7 शेअर्सवर कंपनी 5 नवीन शेअर मोफत मिळतील. त्यादिवशी गुंतवणूकदारांच्या प्रोफाईलमध्ये या कंपनीचे शेअर वाढतील. पण दिसतील काही दिवसानंतर

बोनस शेअर 13 एप्रिल रोजी अलॉट होतील. तर डीमॅट खात्यात हे शेअर 27 एप्रिल, 2026 रोजीपर्यंत दिसतील. कंपनीने सप्टेंबर 2025 रोजी 1:10 या प्रमाणात स्टॉक स्पिल्टची घोषणा केली होती. त्यावेळी शेअरची किंमत 10 रुपयांहून घसरून एक रुपयांवर आली होती. बाजारात लिक्विडिटी वाढवण्यासाठी कंपनीने हे पाऊल टाकले होते.

R M Drip & Sprinklers Systems Ltd कंपनीने गेल्या काही वर्षात गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 2000 टक्क्यांपेक्षा अधिकचा परतावा दिला आहे. 18 मार्च, 2021 रोजी हा शेअर 1.99 रुपयांवर होता. तर 20 मार्च, 2026 रोजी हा शेअर 42.85 रुपयांवर बंद झाला.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भोंदू खरातची आता खैर नाही, 160 GB डेटा, कोडवर्ड लागले हाती; प्रत्येक फोल्डरमध्ये…
  • युद्धात रशियाची अत्यंत मोठी घोषणा, पुढील 32 तासात कोणत्याही प्रकारचा..
  • Gold Purchase : भारतावर सोन खरेदीत या दोन देशांची मात, तेच रशियावर आली सोनं विकण्याची वेळ
  • युद्ध संपताच इराणची मोठी खेळी, पाकिस्तान पाहतच राहिला, चीनला जबर शॉक, भारताला थेट…
  • LPG booking rules: एलपीजी सिलिंडर बुकिंगमध्ये मोठा बदल; सरकारकडून ग्राहकांना इशारा, eKYC अनिवार्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in