• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Bollywood Actress: पन्नाशी उलटली तरी अजूनही सिंगल आहेत या 5 नायिका, एकीने तर सत्तरी ओलांडली

February 28, 2026 by admin Leave a Comment


बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीतील काही अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकावले असले तरी पर्सनल लाईफमध्ये मात्र यांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा जोडीदार यांना मिळालेला नाही. आपण बोलत आहोत अशा पाच अभिनेत्रींबद्दल ज्यांनी पन्नाशी ओलांडली तरी अजूनही त्या सिंगल आहेत.

तब्बू – तब्बू बॉलीवूडची एकेकाळची आघाडीची अभिनेत्री होती. आता ती ५४ वर्षांची झाली आहे. मात्र अजूनही तिने लग्न केलेले नाही.इंडस्ट्रीत तिचे अफेअर्स देखील चर्चेत होते. तिने अनेक रोमांटिक भूमिका देखील केल्या. अजूनही ती इंडस्ट्रीत सक्रीय आहे. मात्र तरीही तिचा जीवनाचा साथीदार तिला अजूनही सापडलेला नाही.

सुष्मिता सेन – सुष्मिता सेन ही भारताची सौदर्यवती स्पर्धा जिंकून बॉलीवूडमध्ये गाजली. तिने करीयरमध्ये अनेक आव्हानात्मक भूमिकाही लिलया केल्या. आजच्या काळातही ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर यश मिळवत आहे. मात्र, पन्नाशी ओलांडूनही ती सिंगलच आहे. तिच्या रिलेशनशिपवरुन मात्र ती चर्चेत असते. अलिकडे तर ललित मोदी यांच्यासोबतही तिचे नाव आले होते.

मनीषा कोईराला – आपल्या अवखळपणा आणि सौदर्यामुळे गाजलेल्या मनिषा कोईराला हीने करीयर चांगले केले. तिने साल २०१० मध्ये लग्न केले होते. मात्र दोन वर्षे ते टिकले. तेव्हापासून ती सिंगल आहे.तिचे वय आता ५५ आहे.

अमीषा पटेल – अमिषा पटेल हीने ऋतिक रोशन सोबत 'कहो ना प्यार है'मधून करियरची जोरदार सुरुवात केली. आता तिचे वय ५० च्या पुढे गेले असले तरी तिचे लग्न झालेले नाही. तिला गदर चित्रपटाने पुन्हा नवीन ओळख मिळाली. मात्र, आता तिचे वय चेहऱ्यावर दिसत असल्याने करियरची गाडीही रखडली आहे.

रेखा – सौदर्यवती रेखा हीने अभिनयात जी कमाल केली आहे ती अजून प्रेक्षक विसरलेले नाहीत. मात्र आता ७१ वयाची झाली असतानाही रेखा एकटीच आहे. रेखाने अनेक विवाह केले होते.अमिताभ बच्चन आणि विनोद मेहरा यांच्याबरोबरचे त्यांचे संबंधही गाजले. मात्र आज त्या एकट्या जीवन जगत आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • काँग्रेसची बारामती पोटनिवडणुकीतून माघार, जय पवार यांची पहिली प्रतिक्रिया, काँग्रेसचे मानले आभार…
  • डेविड मिलरच्या चुकीबाबत शुबमन गिल काय म्हणाला? ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं Video
  • Baramati News | ‘मी जड अंत:करणाने फॉर्म मागे घेतोय, माझ्यावर दबाव…’ आकाश मोरे काय म्हणाले?
  • आरे देवा! पैठणी साडीवर बिकिनी ब्लाऊज, बोल्ड अभिनेत्रीचा नवीन लूक पाहून सर्वांनाच बसला धक्का
  • Pakistan:…तर कलकत्यावर थेट हल्ला!पाकचा संरक्षण मंत्री बरळला, युद्धाला तोंड फुटणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in