• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

BMC Mayor | मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट

January 25, 2026 by admin Leave a Comment


भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेची महापालिकेतील गट नोंदणी प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील सत्तास्थापनेला विलंब होत आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर महापौरपदासाठी 31 जानेवारी रोजी मतदान घेण्याचा निर्णय झाला होता, मात्र भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने कोकण आयुक्तालयाकडे आवश्यक कागदपत्रांसह गट नोंदणी न केल्याने निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलावा लागला आहे. गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच महापौर निवडीचा नवा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. या विलंबामुळे मुंबईतील सत्तासमीकरणांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षांकडून यावर टीका केली जात आहे. मात्र नवीन महापौरांची निवड फेब्रुवारी महिन्यात होणार असे स्पष्ट करण्यात आले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मंगळवारी संपूर्ण भारतात काम बंद, गिग कामगारांची सर्वात मोठी घोषणा, काय-काय बंद राहणार?
  • सारखं सारखं ओटी पोटामध्ये दुखणं ‘या’ आजाराचा संकेत, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
  • ऑफिसचा वर्कलोडमुळे तणाव वाढतोय? ‘हे’ सोपे टिप्स करा फॉलो….
  • India vs Pakistan: तरच टीम इंडिया विरुद्ध खेळणार! पाकिस्तानची अट काय? जाणून घ्या
  • WPL 2026 Eliminator : दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पोहचण्यासाठी सज्ज, यूपी रोखणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in