• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

BMC Mayor : मुंबईत भाजपचाच महापौर ! पण दुसऱ्यांदा… कोण होते पहिले महापौर ?

February 11, 2026 by admin Leave a Comment


बहुचर्चित मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आज बऱ्याच वर्षांनी बीएमसीला महापौर आणि उपमहापौर मिळणार आहे. महायुतीकडून भाजपच्या रितू तावडे या महापौर असतील तर शिवसेनेचे संजय घडी हे उपमहापौरपद स्वीकारणार आहेत. अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे.  या निवडणुकीत महापौरपदासाठी भाजप सेनेत रस्सीखेच झाल्याचे बोलले जात होते. अखेर भाजपचा महापौर विराजमान होणार आहे. मात्र रितू तावडे यांच्या रुपाने भाजपचा पहिलाच महापौर बसणार, असा जो दावा केला जात आहे तो चुकीचा आहे. कारण यापूर्वीही एकदा भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबई महापालिकेत विराजमान झाला होता.त्यामुळे यंदा रितू तावडे या महापौर झाल्या असल्या तरी भाजपचा महापौर होण्याची ही पहिली नाही, तर दुसरी वेळ आहे.

कोण होते भाजपचे महापौर ?

ती व्यक्ती म्हणजे म्हणजे भाजपचे निष्ठावान डॉ. प्रभाकर पै. तब्बल 4 दशकांपूर्वी म्हणजे 1982 ते 1983 पर्यंत डॉ. पै हे मुंबई महापालिकेचे महापौर होते. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. पै हे मूळचे कर्नाटकमधील उडपीतील बारकूर येथील निवासी होते, अशीही माहिती समोर आली आहे. त्यावेळी राजकीय समीकरणे आजच्या तुलनेत खूप वेगळी होती. तेंव्हा जनता पक्षातून फुटून भाजपची नुकतीच स्थापना झाली होती. तेव्हा भाजपचा खूप विस्तार नसला तरी पक्षाची मुंबईच्या राजकारणार चांगलीच छाप उमटल्याचे दिसून आलं.

प्रभाकर पै कोण ?

मूळचे कर्नाटकचे असलेले डॉक्टर प्रभाकर पै हे उडपीतील बारकूर येथील गावा जन्मले होते. व्यवसायाने ते डॉक्टर होते, मात्र त्यांना समाजसेवेची ओढ होती, त्यामुळेच ते मुंबईत आले. गर्भवती महिला, मलेरियाग्रस्त तरुण किंवा आजारी वृद्धांना वेळेवर मदत न मिळाल्याने होणाऱ्या मृत्यूच्या घटना त्यांना अस्वस्थ करत. त्यांनी वंचितांसाठी वैद्यकीय केंद्रे उभारण्याचा आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला सक्षम करण्याचा संकल्प केला. वांद्रे-खार परिसरात त्यांचा वैद्यकीय व्यवसाय खूप यशस्वी होता.

डॉ. पै हे 1968 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 1968 ते 1984 या काळात त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलं. आणि त्याच कालावधीत 1982 ते 1983 या काळात त्यांनी महापौरपद भूषवले. एवढंच नव्हे तर डॉ. पै यांनी बेस्ट समितीचे अध्यक्ष आणि आरोग्य समितीचे अध्यक्ष म्हणूनही महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.

ज्येष्ठ पत्रकारांनी आठवणींना दिला उजाळा

भाजपचे पहिले महापौर असलेल्या डॉ. पै यांच्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी महत्वाची आठवण सांगितली. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांनी एक पोस्ट शेअर केली होती. ” मुंबईच्या महापौर पदासाठी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची सेना यांच्यात चाललेल्या अकटोविकट संघर्षात भाजपला महापौर पद मिळालेच तर जो कोणी महापौर होईल तो भारतीय जनता पक्षाचा दुसरा महापौर असेल… 1982 मध्येच डॉक्टर प्रभाकर संजीवा पै हे मुंबईचे महापौर झाले होते आणि ते भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान नेते होते याची आठवण तेव्हा त्या महापौर कार्यालयात कार्यरत असलेले ज्येष्ठ अधिकारी प्रकाश परांजपे शहापूरकर यांनी आत्ता दुपारी करून दिली.. पै यांची आठवण करून दिल्याबद्दल परांजपे यांना धन्यवाद. परांजपे यांनी आणखीही एक गोष्ट सांगितली.. पै महापौर असतानाच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक शिबीर झाले होते त्या शिबिरास महापौर असलेले पै हे संघाचे अर्धी चड्डी घालून उपस्थित होते आणि त्यांच्या समवेत तिथे परांजपेही गेले होते.” अशी आठवण अकोलकर यांनी लिहीली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Viral Video: चीनचे भन्नाट एटीएम, सोने वितळवून 30 मिनिटांत खात्यात पैसे पोहचवते
  • दाऊदमुळे माझं घर चालतं, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या विधानाने खळबळ, नेमकं काय म्हटलं?
  • सॅमसंग गॅलेक्सी A57 5G आणि A37 5G भारतात विक्रीसाठी उपलब्ध, जाणून घ्या त्यांची किंमत
  • मोठी बातमी! आता भाजपमधील इनकमिंग बंद, दुसऱ्या पक्षातील खासदारांना पक्षात नो एन्ट्री?
  • IPL 2026: अर्शदीप सिंगने 4 षटकात दिल्या 50 धावा, तरीही मिळालं 1 लाखांचं बक्षीस

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in