• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

BMC Elections: मार्करची शाई निघून जाणार की लोकशाही..; तेजस्विनी पंडितच्या पोस्टची चर्चा

January 17, 2026 by admin Leave a Comment


मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित तिच्या बेधडक मतांसाठी आणि वक्तव्यांसाठी ओळखली जाते. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी गुरुवात मतदान झालं. यावेळी तेजस्विनीनेही मतदान केलं आणि मतदानानंतर सोशल मीडियावर स्वत:चा फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये तेजस्विनीच्या बोटावर शाईची खूण पहायला मिळतेय. हा फोटो पोस्ट करत तेजस्विनीने आजचं मत मराठी माणसासाठी असल्याचं म्हटलंय. त्याचसोबत तिने मार्करच्या शाईवरूनही टोला लगावला आहे.

तेजस्विनी पंडितची पोस्ट-

‘माझा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला. मी लहानाची मोठी मराठी भाषा बोलतच झाले. याच मराठी भाषेवर कामारूपी स्वतःचं पोट भरत आले. माझी भाषा टिकली तर माझं काम दिसेल आणि तरंच माझं अस्तित्वही असेल. म्हणूनच आजचं मत त्या मराठी माणसासाठी, ज्याच्या रक्तात मराठी सळसळते आणि ज्याच्या हृदयात आजन्म महाराष्ट्र विराजमान आहे. जय महाराष्ट्र,’ अशी पोस्ट तेजस्विनीने लिहिली आहे. या पोस्टच्या अखेरीस तिने म्हटलंय की, ‘बाकी या वर्षी त्या मार्करची शाई निघून जाणार की लोकशाही ते बघूया.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaswwini 🕊🧿 (@tejaswini_pandit)

महापालिका निवडणुकीत मतदानाच्यावेळी मतदारांच्या बोटावर मार्करने लावण्यात आलेली शाई पुसली जात असल्याचा आरोप मतदार आणि राजकीय नेत्यांकडून झाला. या आरोपांनंतर मतदानासाठी वापरण्यात आलेल्या शाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. अनेक ठिकाणी मतदानानंतर बोटावरील शाई लगेच पुसली गेल्याच्या तक्रारी मतदारांनी सोशल मीडियावर केल्या. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी (अजित पवार) महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, शिवसेना (शिंदे) प्रवक्ते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी त्याकरडे लक्ष वेधलं. यावेळी त्यांनी दुबार मतदानाची भीती व्यक्त केली होती. यानंतर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेतली.

मतदानासाठी वापरण्यात आलेल्या शाईचा दर्जा तसंच शाई पुसली जात असल्याबद्दल पसरविण्यात येणाऱ्या अफवांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असं वाघमारेंनी स्पष्ट केलं. बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणं गैरकृत्य असल्याचं त्यांनी म्हटलंय.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cricket : सूर्यकुमारशिवाय टीम खेळणार, यशस्वीचा समावेश, संघ जाहीर, सामना कधी?
  • टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी आणखी एक खेळाडू दुखापतग्रस्त, खांद्याच्या दुखापतीमुळे आऊट
  • Parliament Budget Session | चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ; राहुल गांधी–राजनाथ सिंह यांच्यात शाब्दिक चकमक
  • 1500 कोटी बजेट अन् कमाई 6200 कोटी, सीनसाठी 500 एकरामध्ये लावली मक्का, चित्रपट ठरला मेगा ब्लॉकबस्टर
  • Budget 2026: तात्काळ दिलासा ते भविष्यातील योजनांचा एक धोरणात्मक सेतू

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in