
Lowest Totals For ICC Men’s T20 World Cup: टी20 क्रिकेट हा जलद आणि मोठी धावसंख्येसाठी ओळखल्या जातो. आक्रमक क्रिकेट इथे दिसतो. पण अनेकदा धावांचा डोंगर उभा करण्याच्या नादात अख्खा संघच कमी धावांवर गारद होण्याची नामुष्की पण काही संघावर ओढावली आहे. अनुभव आणि नियोजनाच्या अभावामुळे संपूर्ण टीमच गारद होण्याचा विक्रम तयार झाला आहे. टी-20 विश्वचषकात सर्वात कमी धावसंख्या तयार करणाऱ्या टॉप पाच संघ 50 धावा सुद्धा करू शकल्या नाहीत. कोणते आहेत हे पाच संघ, त्यातील दोन संघांनी तर हा विक्रम दोनदा केला आहे.
टी-20 विश्वचषकात या संघांवर ओढावली नामुष्की
1. युगांडा (39 धावा, वेस्टइंडीज विरुद्ध सामना, 2024)
युगांडा संघाच्या नावे टी20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात कमी धावा काढण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. हा संघ दोनदा 50 हून कमी धावसंख्येवर गारद झाला आहे. सर्वात कमी धावांचा विक्रम वर्ष 2024 मध्ये झाला. टी20 वर्ल्ड कपमध्ये युगांडाचा संपूर्ण संघ वेस्टइंडिजविरोधात 12 षटकात केवळ 39 धावांवर तंबूत परतला.
2. नेदरलँड (39 धावा, श्रीलंकाविरोधात सामना, 2014)
नेदरलँडचा संघ टी20 विश्वचषकाच्या इतिहासात युगांडासह संयुक्तपणे 39 धावांवर गारद झाला होता. नेदरलँड संघाने ही निच्चांकी धावसंख्या करण्याचा कारनामा 2014 टी20 विश्वचषकात श्रीलंकेविरोधात केला होता.
3. युगांडा (40 धावा, न्यूझिलंडविरोधात सामना, 2024)
युगांडाचा संघ या यादीत तिसर्या क्रमांकावर आहे. कारण 2024 मध्ये खेळल्या गेलेल्या टी20 विश्व चषकासाठी न्यूझीलंडविरोधात हा संघ वाईट रित्या तंबूत परतला. हा संघ केवळ 18.4 षटकात केवळ 40 धावांवर आऊट झाला.
4. नेदरलँड (44 धावा, श्रीलंकाविरोधात सामना, 2021)
टी20 विश्वचषकाच्या इतिहासात टॉप-5 सर्वात कमी धावसंख्या उभारणार्या संघात नेदरलँडने दोनदा विक्रम नोंदवला आहे. वर्ष 2021 मध्ये खेळलेल्या टी20 विश्व चषकात नेदरलँड संघाने श्रीलंकेविरोधात केवळ 44 धावा केल्या होत्या.
5. ओमान (47 धावा, इंग्लंडविरोधात सामना, 2024)
टी20 विश्वचषकात टॉप 5 मध्ये सर्वात कमी धावा करणाऱ्या संघात ओमान संघ पण आहे. ओमानचा संघ वर्ष 2024 मध्ये खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकात इंग्लंडविरोधात केवळ 47 धावांवर गार झाला होता. हा संघ तंबूत परतला होता.
Leave a Reply