• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

BCCI Naman Awards : बीसीसीआयच्या अवॉर्ड सोहळ्यात रोहित शर्मा नसूनही त्याचा असा अपमान, दिग्गज क्रिकेटपटुंच्या कार्यक्रमात एवढ्या मोठ्या चूका

March 16, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने पुन्हा एकदा धूमधडाक्यात आपल्या वार्षिक पुरस्कार सोहळ्याच आयोजन केलं होतं. नमन अवॉर्ड्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या या कार्यक्रमाचं मुंबई ऐवजी दिल्लीत आयोजन करण्यात आलं होतं. मागच्या वर्षभरात वेगवेगळ्या आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या 5 भारतीय टीमचा सन्मान झाला. शुबमन गिल, स्मृती मंधाना, राहुल द्रविडसह अनेक स्टार खेळाडू आणि दिग्गजांना अवॉर्ड देण्यात आले. या इवेंटमध्ये खेळाडूंना त्यांचं प्रदर्शन आणि योगदानासाठी त्यांचं कौतुक करण्यात आलं. याच दरम्यान आयोजकांकडून दोन मोठ्या चूका झाल्या. त्यामुळे सोशल मीडियावर BCCI ची मोठी फजिती झाली.

रविवारी 15 मार्चला BCCI कडून वेगवेगळ्या कॅटेगरीत खेळाडू आणि भारतीय टीमला पुरस्कार देण्यात आला. अंडर-19 महिला वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, महिला वनडे वर्ल्ड कप, टी20 वर्ल्ड कप 2026 आणि अंडर-19 मेन्स वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय टीमच्या खेळाडूंना मेडल देण्यात आलं. इथेच पहिली मोठी चूक झाली. भारतीय फॅन्सचं लगेच या घटनेने लक्ष वेधून घेतलं. या इवेंटच लाइव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्सवर सुरु होतं.

How does a Board get this wrong?

Yes, this is rhetorical. pic.twitter.com/9EYFQZPnIf

— Lavanya 🎙🎥👩🏻‍💻 (@lav_narayanan) March 15, 2026

चूक नोटिस करुन तो फोटो हटवला नाही

अंडर-19 वुमेन्स वर्ल्ड कप 2025 जिंकणाऱ्या टीमच्या खेळाडूंना सन्मानित करण्यासाठी बोलवण्यात आलं, त्यावेळी स्टेजच्या मागे लागलेल्या स्क्रीनवर चुकीचा फोटो दाखवण्यात आला. अंडर-19 महिला टीमच्या फोटो ऐवजी हरमनप्रीत कौरच्या सिनियर महिला टीमचा फोटो दाखवण्यात आला. त्यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कप जिंकलाय. हैराण करणारी बाब म्हणजे आयोजकांनी ही चूक नोटिस करुन तो फोटो हटवला नाही. ज्यावेळी पूर्ण अंडर-19 ची टीम स्टेजवर होती. त्यावेळी हाच फोटो होता.

शुबमन गिलने ही जबाबदारी संभाळली

ही चूक कमी नव्हती, त्यानंतर अजून एक मोठी चूक झाली. त्यावर काही फॅन्स भडकले. खेळाडू आणि कॅप्टन्सनला सन्मानित करण्याच्या या इवेंटमध्ये सीनियर टीम्सच्या कॅप्टन्सना बसवून चर्चेचा एक कार्यक्रम देखील झाला. यात महिला वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि टी20 वर्ल्ड चॅम्पियन टीमचा कॅप्टन सूर्यकुमार यादवही होता. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा रोहित शर्मा या कार्यक्रमाला हजर नव्हता. त्याच्याजागी शुबमन गिलने ही जबाबदारी संभाळली.

🚨 BREAKING 🚨

BCCI deleted this post showing Shubman Gill as Champions Trophy captain instead of Rohit Sharma after backlash. https://t.co/YMJyIBWDl6 pic.twitter.com/QWfracPoaf

— Mention Cricket (@MentionCricket) March 15, 2026

रोहित शर्माचे फॅन्स भडकले

ज्यावेळी स्क्रीनवर गिलचं नाव आलं, त्यावेळी त्याच्यासमोर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा कॅप्टन असं लिहिलेलं. या चुकीने चाहते खासकरुन रोहित शर्माचे फॅन्स भडकले. त्यांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला. BCCI ने जेव्हा हा व्हिडिओ सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट केला त्यावेळी सुद्धा याच चूका होत्या. फॅन्सच्या Reaction नंतर BCCI च्या मिडिया टीमने हा व्हिडिओ हटवला. या चुकांमुळे हा इवेंट टीव्ही स्क्रीनवर पाहणारे फॅन्स मात्र नाराज झाला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nashik Crime : Whatsapp ग्रुप, फ्लॅट, लैंगिक शोषण आणि…तरूणींच्या धर्मांतरासाठी असे रचायचे षडयंत्र, वाचून तुम्हीही हादराल
  • बॉलिवूडच्या 5 सर्वात खतरनाक सासू, ज्यांचं नाव ऐकलं तरी अंगावर येतो काटा, शेवटची तर प्रचंड खडूस
  • Hydrogen Train: झुकझुक नाही, सुसाट…देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन वाऱ्यासोबत धावली, तुम्ही पाहिली का?
  • Kolhapur Ambabai Temple | करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
  • मुलांसोबत ती घर सोडून गेली अन् मी..; रीना दत्तासोबतच्या घटस्फोटाबाबत आमिर खानचा खुलासा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in