• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

BCCI : वर्ल्ड कप जिंकल्यावर टीम इंडियातील दोन खेळाडूंना लॉटरी, बीसीसीआयला जाग आली, त्यांची सॅलरी वाढवणार, किती कोटीने?

March 18, 2026 by admin Leave a Comment


टी20 वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडियातील दोन खेळाडूंसाठी चांगली बातमी आहे. त्यांची सॅलरी वाढवण्यात येणार आहे. वर्ल्ड कपमधील दमदार प्रदर्शनाचा त्यांना फायदा झाला आहे. या खेळाडूंची बीसीसीआयने दखल घेतली आहे. चांगलं प्रदर्शन करुनही सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्यांची सॅलरी कमी झाली होती. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल सतत चांगलं प्रदर्शन करत होते. बुमराह आणि अक्षरची सॅलरी वाढवण्यासाठी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे. बुमराह सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या ए कॅटेगरीमध्ये आहे. त्याची सॅलरी कमी होऊ नये अशी बीसीसीआयची इच्छा आहे. रिपोर्ट्समध्ये हे म्हटलं आहे. बीसीसीआयच्या सेंट्रल ए कॉन्ट्रॅक्टमध्ये वर्षाला पाच कोटी मिळतात. बीसीसीआयने ए प्लस कॅटेगरी संपवली आहे. त्या अंतर्गत बुमराहला 7 कोटी मिळायचे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार बुमराहला कसे पैसे वाढवून द्यायचे त्यावर बीसीसीआय काम करत आहे. बीसीसीआयच्या सूत्राने सांगितलं की, बुमराहला त्याच्या हक्काचे पैसे कसे द्यायचे यावर बोर्ड मार्ग शोधत आहे. काही खेळाडू आहेत, ज्यांची सॅलरी कमी झालीय. सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये बदल होऊ शकतात. बीसीसीआयने बदल केल्यास टी20 टीमचा उपकर्णधार अक्षर पटेलची सुद्धा सॅलरी वाढू शकते. हैराण करणारी बाब म्हणजे अक्षर पटेल ग्रेड सी कॅटेगरीमध्ये आहे. त्याची सॅलरी फक्त एक कोटी आहे. दोन टी20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अक्षर पटेलचं महत्वाचं योगदान होतं. अनेक क्रिकेट एक्सपर्टनी या खेळाडूंची सॅलरी कमी असल्याबद्दल आवाज उठवला होता. बीसीसीआय आता त्यांचं वेतन वाढवू शकते.

BCCI च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये कुठला खेळाडू कुठल्या कॅटेगरीत आहे?

ग्रेड ए मध्ये शुबमन गिल, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा आहे.

ग्रेड बी मध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, कुलदीप यादव, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज आणि वॉशिंगटन सुंदर आहे.

ग्रेड सी मध्ये अक्षर पटेल, रिंकू सिंह, तिलक वर्मा, शिवम दुबे, अर्शदीप सिंह, संजू सॅमसन, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, ध्रुव जुरेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, नीतीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, साई सुदर्शन, रवि बिश्नोई आणि ऋतुराज गायकवाड़ आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in