• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

BBM6: अरे देवा.. तो पुन्हा बिग बॉसच्या घरात..; राकेश बापटबद्दल काय म्हणाली पूर्व पत्नी?

March 11, 2026 by admin Leave a Comment


‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत एजेची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला मराठमोळा अभिनेता राकेश बापट सध्या बिग बॉस मराठीच्या घरात आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी खेळतोय. राकेशने याआधी बिग बॉस हिंदीमध्येही भाग घेतला होता आणि त्यानंतर आता तो मराठीतही चांगला खेळ खेळताना दिसतोय. राकेशची पूर्व पत्नी आणि अभिनेत्री रिधी डोग्राला नुकतंच इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनदरम्यान त्याच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. घटस्फोटानंतरही राकेश आणि रिधी यांच्यात मैत्रीपूर्ण नातं आहे. याच मैत्रीखातर तिने राकेशला कायम पाठिंबा देणार असल्याचं म्हटलंय.

काय म्हणाली रिधी डोग्रा?

“मला राकेशचा खूप अभिमान आहे. तो जबरदस्त परफॉर्म करतोय. आम्हाला आणि मला त्याची खूप काळजी वाटत होती की, अरे देवा.. तू पुन्हा बिग बॉसच्या घरात जात आहेस. पण यावेळी तो खूप छान कामगिरी करतोय. तो जसा आहे तसाच तिथे वागतोय. आम्हाला जो राकेश माहीत आहे, तोच तिथे दिसतोय. मला खूप आनंद आहे की तो स्वत:च्या नियमांनुसार खेळ खेळतोय. राकेशला माझ्याकडून शुभेच्छा आहेतच, पण यावेळी त्याला अशा वेगळ्या पाठिंब्याची विशेष गरज वाटत नाही. तरीसुद्धा मी नेहमीच त्याच्यासाठी चिअर करत राहीन,” अशा शब्दांत रिधी व्यक्त झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ridhi Dogra (@iridhidogra)

“राकेश माझा पूर्व पती असला तरी मला एखादी समस्या सतावत असेल तर मी त्याची मदत आवर्जून घेते. तो माझा पूर्व पती असला तरी माझा सर्वांत जवळचा मित्रसुद्धा आहे”, असं रिधीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. राकेश आणि रिधी यांनी 2019 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या सात वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. एका मालिकेदरम्यान या दोघांची भेट झाली होती आणि सेटवर ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. काही काळ डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. परंतु हे नातं फार काळ टिकू शकलं नाही.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in