• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Bank Account: मोबाईल नेटवर्कप्रमाणे बँक खाते करा स्विच; RBI ची मोठी तयारी

March 31, 2026 by admin Leave a Comment


Bank Account Portability: पेमेंट्स व्हिजन 2028 अंतर्गत केंद्रीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ग्राहकांना दर्जेदार बँकिंग सेवा मिळाव्यात यासाठी खास प्लॅन आखला आहे. आता ज्या बँका चांगली सेवा देणार नाहीत आणि सेवांच्या नावाखाली केवळ ग्राहकांकडून पैसे उकळतील, त्यांना धडा बसणार आहे. ग्राहकांना जर एखाद्या बँकेची सेवा आवडली नाही, तर तो ग्राहक दुसऱ्या बँकेत खाते हस्तांतरीत करू शकणार आहे. त्याचा खाते क्रमांक बदलणार नाही. खाते क्रमांक जुनाच राहिल. बँकेचे नाव बदलेल. बँकेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि ग्राहकांची फसवणूक आणि पिळवणूक टाळण्यासाठी या सुधारणा करण्यात येणार आहे.

काय आहे PaSS?

आरबीआयने ‘पेमेंट्स स्विचिंग सर्विस (PaSS)’ या नावाने एक प्रणाली विकसीत केली आहे. ही प्रणाली एका प्लॅटफॉर्मप्रमाणे काम करेल. याठिकाणी ग्राहकांना त्यांच्या सर्व बँका एकाच ठिकाणी दिसतील. तर या ठिकाणी ते त्यांचे बँक खाते स्विच करू शकतील. ग्राहकांना बँक अकाऊंट पोर्टेबिलिटी करता येईल. मोबाईल कंपनी जशी सध्या बदलता येत आहे, तसेच बँक बदलता येईल. बँक बदलानंतर त्याच्या खात्यावर कोणताही परिणाम होणार नाही. बँक खाते क्रमांक तोच असेल. त्याचे आर्थिक व्यवहार तसेच असतील. त्याच्या खात्यातील रक्कम तशीच असेल. खाते बदलताना त्याच्यावर कोणताही दंड अथवा इतर शुल्क आकारण्यात येणार नाहीत. अर्थात बँक खाते बदलले तरी संबंधित बँकेकडून कर्ज घेतले असेल अथवा इतर थकबाकी असेल तर तो व्यवहार पूर्ण करावा लागेल. अथवा परतफेडीची हमी द्यावी लागेल.

तर दुसरीकडे आता परदेशी पैसा पाठवण्यासंबंधीचे जटिल नियम आणि जटिल प्रक्रिया पूर्णपणे दूर करण्यात येणार आहे. आता सीमे पार सहज आणि सोप्या रित्या पैशांची देवाण-घेवाण करता येईल. तर सेंट्रल बँक डिजिटल करन्सी CBDC च्या विस्ताराने पण परदेशात पैसा पाठवणे सोपे होईल.

आता ई-धनादेश

धनादेश प्रकरणातही मोठा बदल होणार आहे. आता e-cheque चा पर्याय समोर येत आहे. सुरक्षा मानकं आणि डिझाइन यावर काम सुरू आहे. लवकरच ग्राहकांना बँका ई-धनादेश देतील. त्यामुळे चेक बुकसाठी वाट पाहावी लागणार नाही. इलेक्ट्रिक धनादेशासाठी सुरक्षित प्रणाली विकसीत करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे बँकांची, ग्राहकांची फसवणूक होणार नाही. व्यवहारही झटपट होतील आणि चेक बुकवरील खर्चही वाचेल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • GK : फक्त 30 मिनिटे झोपणारा प्राणी, उभं राहून मारतो डुलकी
  • हंसिका मोटवानीने वहिनीलाच म्हटलं ‘सी-ग्रेड अभिनेत्री’; मानहानीचा खटला दाखल, नेमकं काय घडलं?
  • अक्षय तृतीयेला मीठ खरेदी करणे का शुभ आहे? जाणून घ्या शास्त्रीय कारण…..
  • ‘मनबाधा’ चिरंतराची एक अथक जखम… प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांनी डिंगणकर यांच्या पुस्तकाचे मांडले विविध पैलू
  • तुम्हाला चावलेला साप विषारी की बिनविषारी? एका झटक्यात ओळखा, जंगलामध्ये आदिवासी वापरतात ही सोपी ट्रीक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in