• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Badlapur : शाळेच्या व्हॅनमधून उशीरा परतली, भेदरलेल्या चिमुकलीने सांगितलेलं ऐकून आई हादरलीच… बदलापूरमध्ये काय घडलं ?

January 23, 2026 by admin Leave a Comment


साधारण दीड वर्षांपूर्वी बदलापूरच्या शाळेत काही चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या केसमध्ये शाळेतील शिपाई अक्षय शिंदे हाच आरोपी असल्याचेही समोर आले, नंतर त्याला अटक करून केस चालवण्यात आली. पोलिस एन्काऊंटरमध्ये त्याचा मृत्यूही झाला. मुंबईपासून अवघ्या काही अतंरावर असलेल्या बदलापूरमध्ये झालेल्या या प्रकारामुळे जनक्षोभ उसळला होता, अख्ख्या महाराष्ट्रात संतापाचे वातावरण होतं. हे प्रकरण प्रचंड गाजलं. मात्र या दुर्दैवी घटनेच्या, जखमा मनात अजूनही ताज्या असतानाच त्याच बदलापूरमध्ये असाच एक भयानक, नृशंस प्रकार पुन्हा झाल्याच उघडकीस आलं आहे.

बदलापूरमध्ये पुन्हा एकदा एका चिमुकलीवर अत्याचारा प्रयत्न करण्यात आल्याची घचना समोर आली आहे. स्कूल व्हॅनमध्ये एका चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार झाला आहे. बदलापूर पश्चिमेला ही भयानक घटना घडली आहे. त्यामुळे प्रचंड संतापाचे वातावरण असून मुलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणाती आरोपी वाहन चालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात पॉस्को अंतर्ग गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येणार असून पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याचे समजते.

नेहमीप्रमाणे लेक घरी आली नाही, आईच्या मनात शंकेने थैमान

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकली ही अवघ्या चार वर्षांची असून ती बदलापूर पश्चिमेकडील एका खाजगी शाळेत शिकत होती. शाळेत येण्या-जाण्यासाठी तिला व्हॅन लावण्यात आली होती. एरवी ती दुपारी 12.30 पर्यंत घरी यायची मात्र घटनेच्या दिवशी 12.30 वाजून गेल्यानंतरही ती स्कूलव्हॅन मधून घरी परत आली नाही. त्यामुळे तिची आई चिंतेत होती. तिने अखेर स्कूल व्हॅन चालकाकडे फोन करून विचारणा केली.

त्यानंतर साधारण दीड तासानंतर पीडित चिमुकली घरी आली. मात्र ती अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत होती. ते पाहून तिच्या आईला काळजी वाटली. तिने गोडं बोलून, समजावून काय झालं, काय घडलं असं मुलीला विचारत तिच्याकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने जे सांगितलं ते ऐकून त्या माऊलीच्या पायाखालची जमीनच हादरली. नेमकं काय घडलेलें ते त्या भेदरलेल्या चिमुकलीने कसंबसं आईला सांगितलं. आरोपी व्हॅन चालकाने आपल्या गुप्तांगाला हात लावल्याचं तिने तिच्या आईला सांगितलं.

आरोपीला ठोकल्या बेड्या

हे ऐकून तिची आई हादरली, मात्र कशीबशी हिंमत गोळा केली आणि त्यानंतर त्या चिमुकलीच्या पालकांनी तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी व्हॅन चालकाचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या तसेच त्याच्याविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हाही दाखल केला.

दरम्यान हा प्रकार समजताच शहरात खळबळ माजली असून संतापाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी बदलापूर पश्चिमेकडील पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तसंच राष्ट्रवादीच्या संगीता चेंदवणकर यांनी त्या स्कूल व्हॅनवर दगड भिरकावला. बदलापुरात पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. आज आरोपीला कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लाडक्या बहि‍णींसाठी अत्यंत आनंदाची बातमी, थेट मिळणार 4200, सरकारने…
  • मुंबईत मराठी विरुद्ध तामिळ वाद पेटवण्याचा प्रयत्न?
  • गर्लफ्रेंडवर धर्म परिवर्तनाचा दबाव टाकल्याने ब्रेकअप? अखेर ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याने सांगितलं सत्य
  • गर्लफ्रेंडवर धर्म परिवर्तनाचा दबाव टाकल्याने ब्रेकअप? अखेर ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याने सांगितलं सत्य
  • US Tariff On India : टॅरिफ बद्दलचा अमेरिकेचा भारताबाबतचा निर्णय हा पाकिस्तान, बांग्लादेशसाठी झटका, नक्कीच त्यांना मिर्च्या झोंबतील, कारण…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in