• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ayush Mhatre : ये आयुष दादा, वर्ल्ड कप विनर कॅप्टनच्या ऑटोग्राफसाठी छोट्यांची गर्दी, पाहा व्हीडिओ

February 8, 2026 by admin Leave a Comment

भारताने आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात इंग्लंडला पराभूत करुन अंडर 19 वर्ल्ड कप ट्रॉफीवर भारताची मोहोर उमटवली. अंडर 19 वर्ल्ड कप विजयानंतर भारतीय संघाचं रविवारी संध्याकाळी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळेस क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. आपल्या लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येत उपस्थित होते. खेळाडूंनी चाहत्यांकडून शुभेच्छांचा स्वीकार केला आणि देशवासियांसह वर्ल्ड कप विजयाचा आनंद साजरा केला. त्यानंतर सर्व खेळाडू आपल्या घरी रवाना झाले. भारताचा कर्णधार विरारकर आयुष म्हात्रे आपल्या घरी पोहचला. त्यानंतर अवघ्या काही वेळात आयुषची जंगी मिरवणूक काढण्यात आली.

आयुषने वर्ल्ड कप जिंकून देत भारताचं नावं उंचावलं. तसेच आयुषमुळेच विरारचं नाव जागतिक पातळीवर पोहचलं. या वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराला पाहण्यासाठी वसई-विरारकरांनी एकच गर्दी केली. आयुषची एका चारचाकी गाडीतून ही विजयी मिरवणूक काढण्यात आली.

आयुषने नालासोपारा पूर्वमध्ये असलेल्या गणेश पार्क या मैदानातून क्रिकेटची सुरुवात केली. त्याच मैदानातून आयुषच्या विजयी मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. या मिरवणुकीत आयुषच्या नातेवाईकांसह वसई-विरारकर सहभागी झाले. आपल्या गावातल्या पोराने जगात नाव कमावल्याचा आनंद गावकऱ्यांचा चेहऱ्यावर या मिरवणुकीदरम्यान पाहायला मिळाला. तसेच चाहत्यांनी मिरवणुकीत आयुष म्हात्रेचा जयघोष करण्यात आला.

ये आयुष दादा, छोट्या चाहत्यांची उपस्थिती

#WATCH | Maharashtra | Captain of the ICC Under-19 Cricket World Cup champion team, Ayush Mhatre, receives a grand welcome upon his arrival at his hometown, Virar. pic.twitter.com/qvuXdpFtmT

— ANI (@ANI) February 8, 2026

आयुषचं या विजयी मिरवणुकीच ठिकठिकाणी स्थानिकांकडून स्वागत करण्यात आलं. आयुषचा हारतुऱ्यांनी सत्कार करण्यात आला. आयुषला पाहण्यासाठी त्याच्या छोट्या चाहत्यांनीही एकच गर्दी केली होती. ये आयुष दादा, अशी एका छोट्या चाहत्याने कॅप्टनला हाक मारली. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विमानात असतं एक अत्यंत सिक्रेट बटण, चुकून दबल्यास थेट अपघात; पण नेमका उपयोग काय?
  • Jio-Airtel चे यूजर्स मोफत पाहू शकतात T20 World Cup, काय करायचे ते वाचा
  • भारतातल्या वाईन, व्हिस्कीचं भवितव्य धोक्यात? अमेरिकेसोबतच करार होताच…मोठी अपडेट समोर!
  • 10 वर्षांनी लहान असणाऱ्या पतीसोबत प्रियंका चोप्रा झाली रोमँटिक, 5 नंबरच्या फोटोवरून तर नजर हटणार नाही
  • 300 किलो सोनं लुटणाऱ्या कुख्यात प्रिन्सचा एन्काऊंटर, धाड धाड गोळ्या झाडल्या! नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in