• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Aviva Baig : प्रियांका गांधी यांच्या भावी सूनेचं शिक्षण काय? वाचून चकितच व्हाल!

December 30, 2025 by admin Leave a Comment


सध्या देशात गांधी-वाड्रा परिवार एका आगळ्यावेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. या कुटुंबात लवकरच सनई-चौघडे वाजणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार प्रियांका गांधी यांचे पुत्र रेहान वाड्रा यांचे लग्न होणार आहे. प्रियांका गाधी यांच्ये सूनेचे नाव अवीवा बेग असे आहे. प्रियांका गांधी यांची सून होणार असल्याने अवीवा नेमकं काय करते? तिचे शिक्षण किती झालेले आहे, असे विचारले जातेय.

मिळालेल्या माहितीनुसार अवीवा आणि रेहान हे गेल्या बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. त्यांच्या नात्याला या दोघांच्याही कुटुंबीयांनी परवानगी दिलेली आहे. त्यांच्या लग्नाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र अवीवा बेग ही मुळची दिल्लीमधील राहणारी आहे.

दिल्लीमधूनच तिने तिचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. विशेष म्हणजे तिने पत्रकारिता आणि जनसंवाद विषयात पदवी मिळवलेली आहे. ती एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. तिने काम केलेल्या फोटांना तसेच व्हिज्यूअल प्रोजेक्ट्सना जगभरात ओळख मिळालेी आहे. व्हिज्यूअल स्टोरीटेलिंगमध्ये तिला विशेष रस आहे.

अवीवा एक फोटोग्राफी आणि प्रोडक्शन स्टुडिओची सहसंस्थापक आहे. या प्रोडक्शन स्टुडिओने आतापर्यंत अनेक ब्रँड्स, एजन्सी, क्लायन्ट्ससोबत काम केलेले आहे. अवीवाच्या व्हिज्यूएल प्रोजेक्टला अनेक आर्ट एक्झिबिशन तसेच डिझाईन ईव्हेंट्समध्ये प्रदर्शनासाठी स्थान मिळालेले आहे.

अवीवा नेमकी किती कोटींची मालकीण आहे? तिच्याकडे किती संपत्ती आहे? हे अद्याप समोर आलेली नाही. परंतु एका सधन कुटुंबातून येत असल्याने ती आर्थिक दृष्टीकोनातून स्थिरस्थावर असेल, असे सांगितले जात आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शरद पवारांना सर्वात मोठा धक्का, बड्या नेत्याचा शेवटच्या क्षणी थेट राजीनामा; पक्षात मोठी खळबळ!
  • Ajit Pawar NCP : दादांच्या राष्ट्रवादीकडून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना तिकीट, उमेदवारांच्या निवड प्रक्रियेवर सवाल
  • Pune Crime : जमिनीच्या वादातून फॉर्च्यूनर अंगावर घालण्याचा प्रयत्न, कोयत्याने तोडफोड, कुटुंबाला मारहाण
  • युतीचं कुठं घडलंय, कुठे बिघडलंय… पाहा 29 महापालिकेची डिटेल्स
  • Gold Rate : सोन्याला आले वाईट दिवस, एकाच दिवसात भाव धाडकन खाली आला, 10 ग्रॅमसाठी किती रुपये लागणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in