आपण आपल्या दैनंदिन जीवनात अशा काही गोष्टी करतो, ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. पण त्याची आपल्याला जाणीव होत नाही. दैनंदिन जीवनात अशा काही सवयी देखील अवलंबल्या जातात, ज्या हळूहळू आपली हाडे कमकुवत करण्याचे काम करतात. यामुळे गुडघेदुखी, लवकर थकवा आणि चालण्यास त्रास होतो. लहान वयातच लोकांना हाडांशी संबंधित समस्या येऊ लागल्या आहेत. जर तुमच्या […]
Uddhav Thackeray : मुंबईत प्रदूषण का वाढलं? इथली हवा आरोग्यासाठी का घातक? उद्धव ठाकरेंनी सांगितलं त्यामागचं कारण
“राज्यात सध्या सुरु असलेल्या नगरपालिका, नगर परिषद निवडणुकीत पैशांचा धूर निघतोय. सामनाचा अग्रेलख तुम्ही वाचला असेल. पैशांचा पाऊस, अतिवृष्टी भयानक पद्धतीने महाराष्ट्रात सुरु आहे. सत्तेचा माज, या सर्व राजकर्त्यांच्या वक्तव्यातून, वागणुकीतून पाहतोय. आठ-दहा दिवसांपूर्वी मी शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसलो होतो. त्यांच्या व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याप्रमाणे एकही मंत्री शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसला नाहीत. जिथे जातात, तिथे […]
मला मित्रासोबत बोलायचं, कैद्याची पोलिसाकडे मागणी, नकार मिळताच केलं असं काही… कल्याण जेलमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा
कल्याणमधील आधारवाडी कारागृहात गंभीर घटना उघडकीस आली आहे. जेलमध्ये असलेल्या एका कैद्याला त्याच्या मित्रासोबत गप्पा मारण्याची परवानगी न दिल्याने संतप्त झालेल्या कैद्याने धक्कादायक कृत्य केले आहे. या कैद्याने थेट ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. या झटापटीत संबंधित पोलीस हवालदार किरकोळ जखमी झाले आहेत. नेमकं काय घडलं? हितेंद्र उर्फ हितेन गुलीवर ठाकूर (३०) असे दगडफेक […]
Smriti Mandhana Marriage : स्मृतीच्या टीम इंडियातील जवळच्या मैत्रिणीने पलाशबाबत उचललं धक्कादायक पाऊल, लग्नात काहीतरी मोठं घडल्याचे स्पष्ट संकेत
टीम इंडियाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा 23 नोव्हेंबरला रविवारी सांगलीत फार्म हाऊसवर विवाह होणार होता. 20 नोव्हेंबरपासून लग्नाच्या विधींना सुरुवात झालेली. मेहेंदी, संगीत हे कार्यक्रम झालेले. लग्नाच्या काही तास आधी अचानक लग्न सोहळा रद्द करत असल्याचं जाहीर करण्यात आलं. स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यामुळे लग्न […]
India-Canada Deal : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून भारताची कॅनडासोबत मोठी डील, टॅरिफवरुन छळणाऱ्या ट्र्म्पना हेच परफेक्ट उत्तर
न्यूक्लियर पॉवर आणि एनर्जी या बाबतीत भारत आता संपूर्ण जगात आपली छाप उमटवणार आहे. यासाठी सरकार कॅनडासोबत 10 वर्षांची डील साइन करणार आहे. ही डील जवळपास 2.8 अब्ज डॉलर्सची असू शकते. त्यासाठी कॅनडाची कंपनी भारताला युरेनियमचा पुरवठा करणार आहे. ही डील अशावेळी होत आहे, जेव्हा अमेरिकी टॅरिफमुळे भारत आणि कॅनडा दोघांच्या अर्थव्यवस्थांचं नुकसान होत आहे. […]
अचानक लघवीचा प्रवाह खंडित होतो का? मूत्राशयात ताठरपणा येतो? घरातील ‘हे’ 4 उपाय करा
लघवीचे निरीक्षण करून, आपण बऱ्याच समस्या त्वरीत शोधू शकता. हे आपल्याला मूत्र प्रणालीच्या समस्यांबद्दल विशेषतः सांगते. ज्यामुळे उपचार घेणे आणि रोगाचे मुळापासून निर्मूलन करणे सोपे होते. अनेकदा मूत्रपिंडातील दगडांमुळे लघवीमध्ये बदल होतात. पण तुम्हाला माहिती आहे का की लघवीचा प्रवाह क्षीण होतो, तो अचानक तुटतो, पुन्हा सुरू होतो, ही सर्व लक्षणे मूत्राशयाच्या ताठरपणामुळे असू शकतात. […]