• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

AUS vs IND : टीम इंडियाचा पहिला पराभव, ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोठी संधी गमावली, काय झालं?

February 19, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत मेन्स टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात बुधवारी 18 फेब्रुवारीला नेदरलँड्सवर मात केली. टीम इंडियाने यासह साखळी फेरीत सलग चौथा विजय मिळवला. आता टीम इंडिया काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सुपर 8 फेरीसाठी मैदानात उतरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला वूमन्स टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात या दौऱ्याची सुरुवात विजयाने केली. भारतीय महिला संघाने 3 सामन्यांच्या टी 20I मालिकेत विजयी सलामी दिली. त्यामुळे भारताला सलग दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी होती. मात्र यजमान ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात जोरदार कमबॅक केलं.

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर कॅनबेरातील मानुका ओव्हलमध्ये झालेल्या सामन्यात 19 धावांनी मात केली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर 164 धावांचं आव्हान ठेवलं होतं. महिला ब्रिगेडला प्रत्युत्तरात 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 144 धावांपर्यंतच मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाने या विजयासह दुहेरी कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाने मालिकेत विजयाचं खातं उघडलं. तसेच ऑस्ट्रेलियाने मालिकेत आव्हान कायम राखत 1-1 ने बरोबरी साधली. आता उभयसंघातील तिसरा, निर्णायक आणि अंतिम सामना हा शनिवारी 21 फेब्रुवारीला होणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?
  • CSK vs DC Live Streaming : चेन्नईसमोर दिल्लीचं आव्हान, यलो आर्मी घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडणार?
  • PBKS vs SRH Live Streaming : हैदराबादसमोर पंजाबचं आव्हान, ऑरेंज आर्मी विजयरथ रोखणार? सामना किती वाजता?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in