
भोंदू बाबा खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासात आता नवे नाव समोर आले असून, रुपाली चाकणकर यांची बहिण प्रतिभा चाकणकर या शिर्डी पोलीस ठाण्यात हजार असल्याचं कळतंय, खरात नामनिर्देशित असलेल्या 132 खात्यांच्या प्रकरणाच्या अनुषंगाने प्रतिभा चाकणकर यांची चौकशी केली जाणार आहे. समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर चार खाती असल्याची माहिती समोर आली आहे. या खात्यांमधून सुमारे 2 कोटी 40 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचेही उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक होत असून, पोलिसांकडून नोंदवण्यात येणाऱ्या जबाबातून नेमकी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील तपासात आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Leave a Reply