
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील तपास अधिक तीव्र झाला असून, खरातच्या अडचणी वाढल्या आहेत. सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी धक्कादायक दावा करत, अशोक खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला. तसेच, तपासादरम्यान एसआयटीच्या हाती काही पेनड्राईव्ह आणि महत्त्वाचा डिजिटल डेटा लागला असून, त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
याशिवाय, खरातवर हरणाची शिकार केल्याचा संशय असून, त्याने काही लोकांना कस्तुरी दिल्याचाही आरोप समोर आला आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणातील डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी आणखी कोठडीची गरज असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले. मात्र, आरोपीच्या वकिलांनी तपास पूर्ण झाल्याचा दावा करत, कोठडीची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद केला. तरीही न्यायालयाने तपासाच्या दृष्टीने पाच दिवसांची वाढीव पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
Leave a Reply