• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ashok Kharat | रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?

April 10, 2026 by admin Leave a Comment


राज्यभर गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी खरात याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. त्यानंतर महिला अत्याचार आणि फसवणुकीचे अनेक गुन्हे उघडकीस आले असून प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात आता नवे वळण आले असून रुपाली चाकणकर यांच्या बहिणी प्रतिभा चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिर्डी पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली असून जबाब नोंदवण्यासाठी पाच दिवसांत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तपासादरम्यान समता पतसंस्थेतील अनेक खात्यांमध्ये संशयास्पद व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर असलेल्या खात्यांचे नॉमिनी म्हणून अशोक खरातचे नाव असल्याचे आढळले असून या खात्यांतून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती आहे. प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाच्या नावावरही चार खाती असल्याचे निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत 33 खातेदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून इतरांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात काही राजकीय व्यक्तींशी संबंधित फोटो समोर आल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • HIV Report : महाराष्ट्रातील धक्कादायक घटना, पैशांसाठी खोटा एचआयव्ही रिपोर्ट दिला, महिलेचा संसार उद्धवस्त
  • आता घुसा किचनमध्ये अन् बनवा नव्या रेसिपी… कांद्यापासून कारल्यापर्यंत सर्वच स्वस्त, अनेक भाज्यांचे भाव दुप्पट घसरले
  • मोठी बातमी! पाकिस्तान मालामाल, भारताचा मित्र रशियाचं पाकला मोठं गिफ्ट, पुतिन यांची सर्वात मोठी घोषणा
  • मोठा राजकीय भूकंप होणार? शिंदेंसोबत ठाकरेंच्या नेत्यांची गुप्त बैठक? बडा नेता म्हणाला, मीही तसं…
  • Karuna Munde | करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने संधी दिली तर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in