• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ashok Kharat: अशोक खरातचं भविष्य धोक्यात! पोलिसांच्या हाती लागले ते मोबाईल नंबर, आता कुंडलीच बाहेर येणार, अपडेट काय?

March 22, 2026 by admin Leave a Comment


Nashik Captain Ashok Kharat: अनेक महिलांचे लैंगिक शोषणा करणारा भोंदू ज्योतिषी अशोक खरात याचंच भविष्य धोक्यात आलं आहे. भविष्य सांगण्याच्या बहाण्याने त्याने महिलांचे जीवन नासवले. अनेकांच्या जमिनी हडपल्या. राजकीय नेत्यांचे पाठबळ असल्याने आपल्यापर्यंत कोणीच पोहचू शकत नाही याचा त्याला विश्वास होता. पण त्याचे कारनामे समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्या नावावर 52 मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. दरम्यान काल अशोक खरात याची 7 तास चौकशी करण्यात आली. SIT ने अशोक खरात आणि त्याचा चेला नीरज जाधव यांना एकमेकांसमोर बसवून चौकशी केली. त्यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

40 महिलांचे नंबर हस्तगत

काल नाशिक येथे SIT ने कॅप्टन खरात आणि ऑफिस बॉय नीरज जाधव याची एसआयटी मार्फत समोरासमोर चौकशी करण्यात आली. या चौकशीत ऑफिस बॉय धीरजकडून 40 महिलांचे नंबर हस्तगत करण्यात आले. त्यामुळे अशोक खरातचा पाय खोलात गेला आहे. नीरज आणि त्याच्यात या चौकशी दरम्यान अनेकदा खडाजंगी झाली. 7 तास कसून चौकशी करण्यात आली. त्यात खरात काय उगळला हे अजून गुलदस्यात आहेत. त्याने कुणाच्या मदतीने आणि जोरावर इतकी संपत्ती, मालमत्ता कमावली. त्याला कुणाचे पाठबळ होते. कोणते मंत्री त्याचे चेलेचपाटे होते या बाबी अद्याप समोर आल्या नाहीत.

आता लँड एजंट टार्गेटवर

नीरज जाधव आणि कॅप्टन खरात याच्या चौकशीत दोन नावं समोर आली आहेत. भायखळ्यातून परब तर पुण्यातून जासूद याची देखील एसआयटीमार्फत चौकशी होणार आहे. नीरज जाधव याच्या कडून आणखी काही लँड एजंटचे नंबर हस्तगत केले आहे. त्यामुळे खरात याने जोर जबरदस्तीने जमीन हडपल्या. मालमत्ता जमवल्या, त्याची कुंडली आता निघणार आहे. खरातच्या बड्या भक्तांच्या शोधासाठी सीडीआर तपासला जाणार आहे. गृह विभागाची पूर्वपरवानगी घेऊन SIT सीडीआर तपासणी करणार आहे. कॅप्टन खराची तीन दिवसात 20 तास चौकशी करण्यात आली आहे, या चौकशीतून बरंच काही हाती लागण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in