
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठी त्यांचे पार्थिव लोअर परेल येथील निवासस्थानाहून छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे नेण्यात येत आहे. सकाळपासूनच त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी सर्वसामान्य नागरिकांसह बॉलिवूडमधील अनेक मान्यवर आणि राजकीय नेत्यांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच सकाळी पोलिसांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. आशा भोसले या भारतीय संगीत क्षेत्रातील एक दिग्गज नाव असून त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या पार्थिवाला फुलांनी सजवलेल्या स्वर्गरथात ठेवण्यात आले असून तो अंत्यसंस्कारासाठी शिवाजी पार्ककडे रवाना झाला आहे.
दरम्यान, परिसरात शोकाकुल वातावरण असून चाहत्यांकडून आणि उपस्थित नागरिकांकडून आपल्या लाडक्या गायिकेला अखेरचा निरोप दिला जात आहे.
Leave a Reply