• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Asha Bhosle Funeral Updates : स्वरांच्या देवीचं अखेरचं दर्शन… चाहत्यांची रीघ; असा असणार अंत्ययात्रेचा मार्ग

April 13, 2026 by admin Leave a Comment


दैवी सुरांचं देणं लाभलेल्या, थोरा-मोठ्यांपासून ते लहानापर्यंत सर्वांना ज्यांच्याबद्दल निरातिशय जिव्हाळा वाटतो अशी स्वरांची देवी अर्थात ‘आशा भोसले’ (Asha Bhosle) … ठसकेबाज लावणी असो उडत्या चालीचं गीत असो किंवा ‘मेरा कुछ सामान’ सारखं अप्रतिम गीत… आपल्या गळ्यातल्या सुरांनी, आपल्या आवाजने सर्वंच गीतांना अजरामर करणाऱ्या आशा भोसलं यांचं, काल ( रविवार 12 एप्रिल) वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. अस्वस्थ वाटू लागल्याने शनिवारी सांयकळी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते, अखेर काल तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मल्टी-ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी नमूद केलं.

आशा भोसले याच्या निधनाची बातमी येताच काल फक्त महाराष्ट्र किंवा भारत हळहळला नाही, तर त्यांच्या सुरांनी मंत्रमुग्ध झालेले, जगबरात पसरलेले त्यांचे कोट्यवधी चाहते काल शोकाकूल झाले. अनेक राजकारणी, प्रसिद्ध व्यक्तीमत्वं, गायक, संगीतकार, सेलिब्रिटींनी विविध पोस्टद्वारे सुरांच्या या सम्राज्ञीला मानवंदना देत श्रद्धांजली वाहिली. काल देण्यात आलेल्या माहितीनुसार, आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आशा भोसलेचं अखेरच दर्शन घेण्यासाठी चाहत्यांची रीघ

आशा भोसले यांच काल निधन झाल्यानंतर अंत्यदर्शनसाठी त्यांचं पार्थिव कॅसा ग्रॅंडे येथील त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आलं आहे. काल मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांचं अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. राज ठाकरे तसेच इतर अनेक महत्वाचे नेतेही काल अंत्यदर्शनासाठी आले होते. आज बॉलिवूड क्षेत्रातील, संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार, गायक, संगीतकार यांच्यासह आशा भोसले यांचे असंख चाहते, मान्यवर व्यक्ती त्यांचं अंत्यदर्शन घेणार आहेत. प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान हाही आज सकाळी अंत्यदर्शनासाठी आला होता. आज सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत अंत्यदर्शनाची वेळ ठेवण्यात आली असून त्यांच्या घराबाहेर चाहत्यांची रीघ लागलेली पहायला मिळत आहे. दुपारी. 3.30 वाजता त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होणार असून , शिवाजी पार्क स्मशान भूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आपल्या लाडक्या गायिकेला अखेरचा निरोप देण्यासाठी मुंबईसह संपूर्ण देशभरातून चाहत्यांचा, कलाकारांचा आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा त्यांच्या अंतिम दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर ओघ सुरू आहे. त्यांच्या राहत्या घरी सकाळपासूनच शोकाकुल वातावरण असून चाहत्यांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. राज्य सरकारच्या वतीने आशा भोसले शासकीय सन्मानाने अखेरचा निरोप दिला जाणार असून पोलिस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे.

अंत्यविधीसाठी तयारी

मुंबई महानगर पालिकेकडून आशाताईंच्या अंत्यविधीची तयारी झाली आहे. अंत्यविधीच्या ठिकाणी 500 पेक्षा अधिक अतिमहत्वाचे लोकांच्या आसनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शिवाजी पार्क येथील भागोजी किर स्मशानभूमीच्या आजूबाजूला LED स्क्रीनची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तेथे LED स्क्रीन आणि साउंडवर आशाताईंचे गाणी लावून आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. 10 ते 12 हजार लोक अंत्यदर्शनाला येतील असा महानगर पालिकेचा अंदाज असून त्यानुसार तयारी करण्यात आली आहे. आशा भोसले यांचं पार्थिव शिवाजी पार्क स्मशानभूमीत आल्यानंतर थोडा वेळ अंत्यदर्शनाला ठेवण्यात येणार आहे. स्मशान भूमीत अनेक मंत्री आणि नेते अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत.

असा असेल अंत्ययात्रेचा मार्ग

आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेचा मार्ग खालीप्रमाणे असेल –

कासा ग्रँड एक्झिट गेट- डावे वळण- पेनिन्सुला सिग्नल -उजवे वळण -गणपतराव कदम मार्ग -श्रीराम नाका -वरळी नाका- उजवे वळण डॉक्टर ॲनी बेझंट मार्ग -पोद्दार जंक्शन- ग्लॅस्को जंक्शन-सास्मिरा जंक्शन- हार्डीकर जंक्शन -सेंचुरी जंक्शन- किस्मत जंक्शन- हत्तीचा पुतळा -सिद्धिविनायक मंदिर- काशिनाथ धुरू- कीर्ती कॉलेज- सूर्यवंशी हॉल- डावी वळण-स्मशान भूमी.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अरेरे किती ते हाल! अशोक खरातच्या घशा खाली घास उतरेना, बायकोबद्दल विचारताच…
  • Asha Bhosle Movie: गायिकाच नव्हे अभिनेत्रीही, 79 व्या वर्षी केलं डेब्यू; आशा भोसलेंचा हा चित्रपट पाहिलाय का ? डोळ्यांत येईल पाणी
  • Sanjay Raut Full Press | एकनाथ शिंदें ऐवजी सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नेमकं विधान काय?
  • Sanjay Raut | शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का?; पवारांच्या पोस्टरवरून संजय राऊतांचे विधान चर्चेत
  • Asha Bhosle Video: शाहरुख खान याने आशा ताईंचा उष्टा चहाचा कप उचलेला तेव्हा… पाहत राहिलेला संपूर्ण देश

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in