• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Asha Bhosle Death News: मी अखेरचा मुगल आहे….जेव्हा फिल्म इंडस्ट्रीच्या सीक्रेट्सवर बोलल्या होत्या आशाताई

April 12, 2026 by admin Leave a Comment


Asha Bhosle Death News: बॉलिवूडच्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. त्यांनी ९२ व्या वर्षात शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यू मागचे कारण मल्टी ऑर्गन फेल्युअर सांगितले जात आहे. शनिवारी ११ एप्रिल रोजी त्यांना ब्रीच कँडी रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयुत उपचार सुरु होते. परंतू त्यांची प्राणज्योत मालवल्याचे रविवारी सकाळी जाहीर करण्यात आले. या दरम्यान सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.ज्यात त्या फिल्म इंडस्ट्रीतील सीक्रेट्सवर बोलताना दिसत आहेत.

आशा भोसले यांच्या एका जुन्या मुलाखतीची व्हिडीओ क्लिप फेसबुकवर व्हायरल होत आहे. ज्यात त्या इंडस्ट्री आणि सेलिब्रिटीच्या सीक्रेट्सवर बोलताना दिसत आहेत. यात त्या म्हणतात त्यांना सर्व काही आठवतं. यात त्या स्वत:ला इंडस्ट्रीचा शेवटचा मुगल असल्याचे म्हणताना दिसत आहेत.

मी फिल्म इंडस्ट्रीचा शेवटचा मुगल आहे – आशा भोसले

बीबीसीच्या फेसबुक पेजवर आशा भोसले यांची व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे.त्यात त्या म्हणताना दिसतात की मी या इंडस्ट्रीची शेवटची मुगल आहे. जर तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीचा इतिहास जाणायचा असेल तो केवळ मला माहिती आहे. प्रत्येकाच्या जीवनाबद्दल माहिती आहे. डायरेक्टर, प्रोड्युसर, आर्टिस्ट, सिंगर्स, सगळ्यांच्या बाबतीत मला माहिती आहे. जर बोलायला बसले तर तीन ते चार दिवस जातील.एवढ्या कहाण्या आहेत. त्या सर्व माझ्या मनात येतात. मी काही विसरलेली नाही. मी शेवटचा मुगल आहे या इंडस्ट्रीची.’

आशा भोसले यांचे निधन कसे झाले ?

आशा भोसले यांचे रविवारी ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मृत्यू झाल्याचे त्यांचा मुलगा आनंद याने सांगितले. डॉक्टर प्रतीत समदानी यांनी देखील आशाताईंच्या मृत्यूचे मेडिकल बुलेटीन सांगितले. मल्टी ऑर्गन फेल्युअरने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. काल त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आशा भोसले यांचे करियर

आशा भोसले यांचे करियर साल १९४८ मध्ये पार्श्वगायिका म्हणून सुरु झाले होते. त्यांचे पहिले गाणे ‘चुनरिया’ होते. त्यांनी गायिका गीता दत्त आणि शमशाद बेगम यांच्या सोबत आपले पहिले गाणे ‘सावन आया रे’ गायले होते. याच्या एक वर्षा आधी त्यांनी १९४९ मध्ये चित्रपट ‘रात की रानी’ साठी पहिले सोलो गाने गायले होते. आशा भोसले यांच्या नावे अनोखा रेकॉर्ड नोंदला गेलेला आहे. त्यांनी १२,००० हून अधिक गाणी वेग-वेगळ्या भाषेत गायली आहे. हा रेकॉर्ड कोणी तोडू शकलेला नाही.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : इलाका तुम्हारा धमाका हमारा, विराटची ऐतिहासिक कामगिरी, मुंबई विरुद्ध महारेकॉर्ड
  • येथे भाड्याने मिळते कबर, रेंट नाही भरले तर मृतदेह बाहेर फेकला जातो…
  • इराणकडून भारताला मोठा दणका, होर्मुझमध्ये लावला मोठा ‘टोल टॅक्स’, प्रत्येक जहाजाकडून वसूल करणार इतके कोटी
  • IPL 2026, RR vs SRH : हैदराबाद आणि राजस्थान आमनेसामने, कोणाचं पारडं जड?
  • Asha Bhosle Death News: मी अखेरचा मुगल आहे….जेव्हा फिल्म इंडस्ट्रीच्या सीक्रेट्सवर बोलल्या होत्या आशाताई

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in