• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Asha Bhosle : 1034 विकेट्स घेणाऱ्या बॉलरसोबत आशा भोसलेंनी गायलं होतं हे गाणं, तुम्ही ऐकलं आहेत का ?

April 12, 2026 by admin Leave a Comment


आपल्या दैवी आवाजाने मराठीसह हिंदी चित्रपटातील अनेक गाणी अजरामर करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं आज वयाच्या 92 व्या वर्षी दु:खद निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मल्टी-ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण देशाला धक्का बसला असून चाहते शोकाकूल आहेत. त्या त्यांच्या अष्टपैलू गायन शैलीसाठी ओळखल्या जायच्या. 7 दशकांहून अधिकच्या वर्षआंच्या कारकिर्दीत त्यांनी हजारो गाणी गायली आणि आपल्या आवाजाच्या जादूने लोकांना मंत्रमुग्ध केले. आशा भोसले यांनी अनेक गायकांसोबत काम केले. पणत्यांनी आपल्या कारकिर्दीत 1034 बळी घेणाऱ्या एका क्रिकेटपटूसोबतही एक हिंदी गाणे गायले होतं, हे तुम्हाला माहित आहे का ? आशा भोसले आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेट ली यांची ही जुगलबंदी खूप गाजली होती.

आशा भोसले-ब्रेट ली यांचं गाणं

आशा भोसले आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेट ली या दोघांनी मिळून ‘यू आर द वन फॉर मी’ हे गाणं गायलं. विशेष बाब म्हणजे हे गाणं हिंदीमध्ये होतं आणि ते स्वत: क्रिकेटपटू ब्रेट ली यानेचं लिहीलं होतं. आशा भोसले आणि ब्रेट ली यांनी गायलेले हे गाणे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2006 दरम्यान प्रदर्शित झालं.

आशा भोसले यांच्यासोबत गाणं गायलेला ब्रेट ली, हा क्रिकेटच्या मैदानातील एक उल्लेखनीय खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या ब्रेट लीने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीतील घेतेलेले 1034 बळी हे त्यांच्या टॅलेंटची साक्ष देतात. त्याने हे बळी प्रथम-श्रेणी क्रिकेट, लिस्ट ए क्रिकेट आणि टी20 क्रिकेट या तिन्ही प्रकारांमध्ये मिळून घेतले. ब्रेट ली याने प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये 487, लिस्ट ए क्रिकेटमध्ये 438 आणि टी20 क्रिकेटमध्ये 109 बळी टिपले.

1034 विकेट्सपैकी 718 इंटरनॅशनल विकेट

आशा भोसले यांच्यासोबत हिंदी गाण्याची संधी मिळालेल्या ब्रेट लीने आपल्या 1034बळींपैकी 718 बळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घेतले. त्याने 76 कसोटी सामन्यांमध्ये 310, 221 एकदिवसीय सामन्यांमध्ये 380 आणि 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 28 बळी घेतले.

सचिनसोबतही चांगला बाँड

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याच्याशीही चांगला बाँड होता. त्यांनी सचिनला क्रिकेटचा सर्वश्रेष्ठ तारा म्हटलं होतं. आशा भोसले या 1992 साली आणि 2023 च्या विश्वचषक स्पर्धांमध्ये सचिन तेंडुलकरसोबत दिसल्या होत्या.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • गुलाबी सूटमध्ये प्रिती झिंटाच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
  • वांग्याचं भरीत ते चिकन बिर्याणी… आशाताईंच्या आवडीचे 5 पदार्थ, वाचा…
  • पाकिस्तानला गेलेल्या इराणी शिष्ठमंडळातील नेत्यांच्या डिग्रीची का होत आहे चर्चा ?
  • Shiv Sena | आढावा बैठकीत शेजारी बसूनही शिरसाट, सत्तारांनी एकमेकांशी बोलणं टाळलं, भर मंचावरच…
  • IPL 2026: चेन्नई-दिल्ली सामन्यात काय घडलं? ऋतुराज गायकवाडला शिक्षा, तर नितीश राणाला ठोठावला दंड

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in