
विख्यात गायिका आशा भोसले यांचं काल वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण देशाला धक्का बसला असून चित्रपट आणि संगीत क्षेत्र शोकसागरात बुडाले आहे. चाहते आणि सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर या महान गायिकेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
आज शिवाजी पार्क येथे आशा भोसले यांच्यावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी त्यांचं पार्थिव लोअर परळमधील त्यांच्या राहत्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. अनेक राजकारणी, नेते, दिग्गज कलाकार, क्रिकेटर, अभिनेते यांनी तेथे जाऊन आशा भोसले यांना आदरांजली वाहिली,
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. आशा भोसले यांच्या जाण्यानंतर त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सचिन हा पत्नी अंजलीसोबत आला होता.
सचिनने आशा भोसले यांना पुष्पहार अर्पण केला, त्यांना नमन केले. तेव्हा तो खूप भावूक झालेला दिसत होता, त्याला अश्रू अनावर झाले. . त्याची पत्नी अंजलीनेही आशाताईंना श्रद्धांजली वाहिली.
त्यानंतर सचिनने आशा भोसले यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या कठीण काळात, त्याने भोसले कुटुंबीयांशी संवाद साधन त्यांचं सांत्वन केले. मात्र त्यांच्यासी बोलतानाही तो अतिशय भावूक दिसत होता.
आशा भोसले यांच्या जाण्यानंतर सचिनच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांच्या कुटुंबियांशी बोलताना सचिनला रडू आवरत नव्हतं. सचिन व आशा भोसले यांचे अतिशय कौटुंबिक, जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांची अनेकदा भेट व्हायची
काही दिवसांपूर्वीच सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा विवाह पार पडला, त्यावेळीही आशा भोसले आवर्जून आल्या होत्या. त्यानी अर्जुन सानियाच्या विवाहसोहळ्याला उपस्थित राहून नवदाम्पत्याला भरभरून आशीर्वाद दिले होते.






Leave a Reply