• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Asha Bhosle : आशाताईंचे ते शेवटचे गाणे..जे आता कधीच पूर्ण होणार नाही..

April 12, 2026 by admin Leave a Comment


ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झाल्याने समाजातील सर्व स्तरातून दु:ख व्यक्त केले जात आहे. आशा भोसले यांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत अनेक अजरामर गाणी गायली. परंतू आशा भोसले यांचे शेवटचे ते गाणे आता कधीच पूर्ण होणार नाही. २० भाषेत सुमारे १२ हजार गाणी गाणारी ही गायिका गेल्या काही दिवसात एका गाण्यावर काम करीत होती. परंतू या गाण्याच्या केवळ चारच ओळी राहिल्या होत्या. त्यामुळे आता याच कारणाने हे गाणे कधीच पूर्ण होणार नाही.हे एका प्रायव्हेट अल्बमचे गाणे होते. ज्याचे संगीतकार शमर टंडन आहेत. शमीर यांनी पेज -३, ट्रॅफीक सिग्नल, बाल गणेश आणि कॉर्पोरेट सारख्या चित्रपटांना गाणी दिली आहेत.

आशा भोसले यांच्या निधनानंतर एका खाजगी चॅनलशी बोलताना सांगितले की गेल्या काही दिवसांपासून ते आशाताईंसोबत या गाण्यावर काम करत होते. हे गीत प्रसून जोशी यांनी लिहीले आहे. या गाण्याच्या केवळ चारच ओळी लिहिल्या होत्या, मात्र, तेवढ्यात ही दु:खद बातमी आली.

म्युझिक कंपोजर शमीर टंडन यांनी सांगितले की या गाण्याचे बोल ‘जाने दो…जाने दो’ असे आहेत. यास प्रसून जोशी यांनी लिहिले आहे. आशाताईंनी काही दिवसांपूर्वी रिहर्सल देखील केली होती. त्या नेहमीच एक्टीव्ह असायच्या. त्यांनी माझी भेट २००३ पासून झाली. चार ओळी राहिल्या होत्या. त्या स्टुडिओत कोणत्याही दिवशी येणार होत्या, परंतू असे झाले नाही.
आशा भोसले यांच्या जीवना संदर्भात विचारांवर त्यांनी सांगितले की त्यांची नेहमीच इच्छा होती की त्यांना हसत.. हसत जगाने निरोप देण्यात यावा. त्या जीवनाने परिपूर्ण होत्या. हृदयाने तरुण होत्या. विचारांनीही तरुणच होत्या, त्यांची इच्छा होती की त्यांचे शेवटचे गाणे आलिया भट्ट सारख्या तरुण अभिनेत्रीवर चित्रित व्हावे. त्या अशा प्रकारे एनर्जीने परिपूर्ण होत्या.

शमीर टंडन यांनी पेज थ्री चित्रपटाला संगीत दिले होते. त्याच दरम्यानचा एक किस्सा त्यांनी सांगितला. पेज-३ चे ‘हुजुर ए आला’ हे गाणे त्यांनी गायले होते.

मी त्यांना सांगितले होते हे गाणे मला लवकरात लवकर हवे.परंतू त्या सॅन फ्रासिस्कोला होत्या. नंतर असे पहिल्यांदा झाले की त्यांनी तेथून गाणे रेकॉर्ड केले. त्याकाळी असे होत नव्हते. त्यांनी सांगितले की मला पंचम ( त्यांचे पती आरडी बर्मन ) म्हणायचे की नवीन मुले आणि त्यांच्या टेक्नॉलॉडी सोबत ग्रो केले नाही तर पाठी राहशील.अशा प्रकारे ती एक व्हीजनरी लेडी होती.’

शमीर टंडन यांनी पुढे सांगितले की त्यांच्या घरी गेल्यावर त्या एकदम दीलखूशपणे..शानदारपणे भेटायच्या. ते म्हणाले की मी जेव्हाही त्यांच्या घरी जायचो तेव्हा त्यांच्या हाताने बनवलेले पोहे खायचो आणि कॉफी देखील त्याच बनवायची.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • येथे भाड्याने मिळते कबर, रेंट नाही भरले तर मृतदेह बाहेर फेकला जातो…
  • इराणकडून भारताला मोठा दणका, होर्मुझमध्ये लावला मोठा ‘टोल टॅक्स’, प्रत्येक जहाजाकडून वसूल करणार इतके कोटी
  • IPL 2026, RR vs SRH : हैदराबाद आणि राजस्थान आमनेसामने, कोणाचं पारडं जड?
  • Asha Bhosle Death News: मी अखेरचा मुगल आहे….जेव्हा फिल्म इंडस्ट्रीच्या सीक्रेट्सवर बोलल्या होत्या आशाताई
  • Horoscope : 13 एप्रिलचा दिवस खूपच खास, 3 राशींसाठी पैशांचा दुर्मिळ योग; वाचा नशीब कसं फळफळणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in