• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Asha Bhosale : आशा ताईंची एक चूक… ज्यामुळे उद्ध्वस्त झालं आयुष्य, बहिणींना देखील तोडलं नात… एकट्याच पडलेल्या गायिका

April 12, 2026 by admin Leave a Comment


Asha Bhosle Personal Life Struggles: हिंदी सिनेविश्वातील पार्श्वगायिका आशा भोसले सध्या त्यांच्या प्रकृतीमुळे चर्चेत आहेत. आशा ताई यांची प्रकृती लवकरात लवकर स्थिर व्हावी म्हणून चाहते देखील त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. नुकताच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. आशा भोसले यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांचं नाव केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात आदराने घेतलं जातं. प्रोफेशनल आयुष्यात कोणीच त्यांचा हात पकडू शकलं नाही. पण खासगी आयुष्यात मात्र त्यांनी अनेक गोष्टींचा सामना केला…

एका चुकीने उद्ध्वस्त केलं आयुष्य

आशा भोसले यांना स्वतःला सिद्ध केलं… फार कमी वयात त्यांना आयुष्याने मोठी ठेच दिली. वयाच्या 16 व्या वर्षी आशा भोसले यांनी कुटुंबियांच्या विरोधात जात, गणपत राव यांच्यासोबत लग्न केलं. आशा आणि गणपत यांचं नातं मोठी बहीण लता मंगेशकर यांना मान्य नव्हतं. कारण गणपत राव हे लता मंगेशकर यांचे पर्सनल सेक्रेटरी होते. त्यांच्या निर्णयाला घरच्यांचाही विरोध होता. पण आशा यांनी कोणाचंही ऐकलं नाही, ज्यामुळे स्वतःच्या कुटुंबापासून दुरावल्या एवढंच नाही तर, बहिणींसोबत देखील वाद झाले.

ही वेळ आशा भोसले यांच्यासाठी फार कठीण होती. कारण लग्नानंतर जसं त्यांना वैवाहिक आयुष्य जगायचं होतं, तसं काही झालंच नाही. हळू – हळू परिस्थिती बिघडत गेली… जेव्हा मुलगा हेमंत, जन्माला आला, तेव्हा त्या पुन्हा आपल्या कुटुंबाच्या जवळ आल्या. कालांतराने, त्यांच्या नात्यातील ताण काहीसा कमी झाला. मात्र, तिच्या वैवाहिक जीवनात अनेक आव्हाने उभी राहिली. आशा ताई मुलांच्या संगोपनात पूर्णपणे गुंतून गेल्या. करिअर आणि घर या दोन्ही गोष्टी सांभाळणं सोपं नव्हतं, पण त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरू ठेवले. मात्र, ही गोष्ट गणपत राव यांना अस्वस्थ करत होती.

तेव्हा लता मंगेशकर यांची लोकप्रियता फार मोठी आहे. त्यांना ऑफर देखील सतत येत असायच्या. यामुळे गणपत राव यांचं संताप व्हायचा… काही रिपोर्टनुसार, आशा यांनी शक्य तितके जास्त पैसे कमवावेत अशी त्यांची इच्छा होती. ते अनेकदा पैसे देण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत, इतकंच नव्हे तर बहीण लता यांच्याकडेही पैसे मागत असत. या सर्व प्रसंगांमुळे आशा यांचं आयुष्य अधिकाधिक कठीण होत गेले. या अडचणी असूनही, आशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दीचा कधीही त्याग केला नाही. त्यांनी अथक परिश्रम करून आपली ओळख निर्माण केली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Asha Bhosale: आशा भोसले यांच्या कुटुंबात कोण-कोण? जाणून घ्या फॅमिली ट्रीबद्दल
  • Asha Bhosle: आशा भोसले यांचं संघर्षमयी खासगी जीवन; वयाच्या 47 व्या वर्षी मिळालं दुसरं प्रेम
  • Asha Bhosale : जगातील सर्वात मोठा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आशा ताईंच्या नावावर, जाणून व्हाल अवाक्
  • Asha Bhosle Passes Away : 12 हजारांहून अधिक गाणी, 7 वेळा फिल्मफेअर; आशा भोसलेंचा अल्पपरिचय
  • Asha Bhosle : आशा भोसले काळाच्या पडद्याआड, कुठे, कधी होणार अंत्यसंस्कार ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in