• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Asha Bhosale : आजही ट्रेंड करतायेत आशा ताईंची ‘ही’ गाणी, Reels वर तर जादू

April 12, 2026 by admin Leave a Comment


Asha Bhosle Died: भारतीय संगीत विश्वातील अष्टपैलू गायिका आशा भोसले यांचं निधन झालं आहं. रविवारी (12 एप्रिल, 2026) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या जादुई आणि अष्टपैलू आवाजाने अनेक दशके जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या आशा भोसले आता आपल्यात नसल्या तरी, कलाकार कधीही मरत नाही; ते त्यांच्या कार्यातून जिवंत राहतात. त्याच प्रमाणे आशा ताई देखील त्यांच्या आवाजातून चाहत्यांच्या आठवणीत राहतील. अशी असंख्य गाणी आहेत, जी आशा ताईंनी गायली. पण त्यामधील काही गाणी आजही ट्रेंड होत असतात. एवढंच नाही तर, Reels वर देखील आशा ताई यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत.

दम मारो दम – जेव्हा रील्सवरील स्वॅग आणि ॲटिट्यूडचा विषय येतो, तेव्हा ‘दम मारो दम’ला कोणीही हरवू शकत नाही. गाण्याचं खास संगीत आणि आशाजींचा मंत्रमुग्ध करणारा आवाज सध्याच्या वातावरणाला अगदी साजेसा आहे. तरुण पिढी अनेकदा आपला बोल्ड लूक दाखवण्यासाठी आणि स्लो-मोशन व्हिडिओ तयार करण्यासाठी या गाण्याचा वापर केला जातो…

चुरा लिया है तुमने जो दिल को – हे रोमँटिक गाणं रिल्ससाठी लोकप्रिय आहे. आजही हे गाणे कपल्सच्या आवडीचं गाणं आहे… 1973 मध्ये हे गाणं प्रदर्शित झालेलं. आजकाल त्याचे रिमिक्स आणि लो-फाय व्हर्जन्स प्रचंड ट्रेंड होत आहेत.

झुमका गिरा रे – कोणतंही कार्यक्रम असेल तर, या गाण्याशिवाय कार्यक्रम पूर्ण होत नाही, लग्नात देखील गाणं वाजतं… इन्फ्लुएन्सर्स आशाजींच्या या अजरामर गाण्यावर आपले पारंपरिक दागिने आणि नृत्य सादर करताना दिसतात.

ओ हसीना जुल्फों वाली – कोणत्याही पार्टीमध्ये तर हे गाणं हमखास वाजतं… मोहम्मद रफीसोबतच्या मदतीने हे गाणं एक अजरामर पार्टी अँथम बनलं आहे. या गाण्याच्या हुक स्टेप्सची क्रेझ आजही दिसून येते… यावर अनेक रिल्स देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

ये मेरा दिल प्यार का दीवाना – महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘डॉन’ असो किंवा अभिनेता शाहरुख खानचा, आशा यांनी गायलेलं हे गाणं आजही प्रत्येक कार्यक्रमाची शान ठरतं. मुली अनेकदा त्यांच्या ‘बॉस लेडी’ लूकसाठी हे गाणं निवडतात.

आइए मेहरबान – जर तुम्हाला आशाजींच्या आवाजातील गोडवा पाहायचा असेल, तर हे गाणे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या गाण्यावर ब्लॅक अँड व्हाईट फिल्टर वापरून तयार केलेले रील्स इन्स्टाग्रामवर खूपच कलात्मक दिसतात. अशी असंख्य गाणी सोशल मीडियावर ट्रेंड करत असतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026, MI vs RCB : मुंबईचा आरसीबी विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय, मॅचविनर बॉलरचा पत्ता कट, Playing 11 मध्ये कोण?
  • आशा भोसले आणि लता मंगेशकर यांच्यातील एक विचित्र योगायोग; तुम्हालाही आश्चर्य वाटेल
  • आशाताईंचं 45 वर्षांपूर्वीचं अजरामर गाणं, ज्याचे बोल घेतात काळजाचा ठाव, रेखाच्या डान्समुळेही ठरलं सर्वांचं फेव्हरेट!
  • IPL 2026, LSG vs GT: गुजरातने लखनौला 7 विकेट्स राखून केलं पराभूत, गिलची सावध खेळी ठरली निर्णायक
  • भारताचे मोठे टेन्शन मिठले, कतारने हात वर करताच आणि आता येथून एलएनजीचा होणार पुरवठा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in