• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Arab Nations Summit In India : मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, मुस्लिम देशांच्या बैठकीचं यजमानपद भारताकडे, पाकिस्तानला सणसणीत चपराक

January 30, 2026 by admin Leave a Comment


जगभरातल्या इस्लामिक देशांचे नेते भारताची राजधानी दिल्लीमध्ये जमणार आहेत. शनिवारी 31 जानेवारीला हे नेते एकत्र येतील. या बैठकीची अध्यक्षता भारत आणि UAE करणार आहे. भारच आणि अरब देशांमधील सहकार्याची वीण अधिक घट्ट करणं, भागीदारीला नवीन दिशा देणं हा या बैठकीमागचा उद्देश आहे. या बैठकीत 22 अरब देशांचे परराष्ट्र मंत्री सहभागी होणार आहेत. दिल्लीत भारत मंडपम येथे ही परिषद होणार आहे. भारत या परिषदेच यजमानपद भूषवत आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून या बद्दल माहिती देण्यात आलीय. अरब लीगमधील सर्व सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री आणि अरब लीगचे महासचिव या बैठकीत सहभागी होतील. या बैठकीआधी आज भारत मंडपममध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.

अशी बैठक जवळपास 10 वर्षानंतर होत आहे. अशी बैठक याआधी 2016 साली आयोजित करण्यात आलेली. त्यावेळी ही बैठक बहरीन येथे होती. भारत स्वत: अरब देशांची संघटना लीग ऑफ अरब स्टेट्सचा (LAS) पर्यवेक्षक (ऑब्जर्वर) आहे. या संघटनेत एकूण 22 सदस्य देश आहेत. लीग ऑफ अरब स्टेट्‍सची स्थापना 22 मार्च 1945 रोजी काहिरा येथे झाली. या संघटनेत सुरुवातीला इजिप्त, इराक, जॉर्डन, लेबनान, सौदी अरेबिा आणि सीरिया हे देश होते. त्यावेळी या लीगची सुरुवात सात सदस्यांनी झालेली. सध्या अरब लीगमध्ये जगातील 22 देश आहेत. यात उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील सुद्धा देश आहेत. सीरियाचा पुन्हा समावेश करण्यात आला आहे. या लीगमध्ये आर्मेनिया, ब्राझील, चाड, इरिट्रिया, ग्रीस, भारत आणि वेनेजुएला असे ऑब्जर्वर देश सुद्धा आहेत.

90 लाखापेक्षा जास्त भारतीय इथे काम करतात

भारत आणि अरब देशांमध्ये जुने संबंध आहेत. व्यापार, ऊर्जा, शिक्षा, संस्कृती आणि कूटनीति सारख्या क्षेत्रात मजबूत सहकार्य आहे. भारत आणि अरब देशांमध्ये व्यापार 240 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. भारत आपल्या गरजेचं तेलं, गॅस आणि LPG अरब देशांकडूनच विकत घेतो. 90 लाखापेक्षा जास्त भारतीय अरब देशांमध्ये काम करतात.

भारत का यजमानपद भूषवत आहे?

या बैठकीत दोन्ही बाजू व्यापार, ऊर्जा, शिक्षण, तंत्रज्ञान, मीडिया आणि सांस्कृतिक सहकार्य आणखी मजबूत करण्यावर चर्चा करतील. भारत या परिषदेच यजमानपद भूषवून अरब देशांसोबतचे संबंध अजून बळकट करायचे आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना बसणार आणखी एक मोठा धक्का, चिंता वाढवणारी बातमी समोर
  • रोहित शेट्टीला ठार मारण्याचाच इरादा होता? किती राऊंड फायरिंग? नव्या अपडेटने खळबळ, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
  • Union Budget 2026 : चीनला मोठा दणका, सेमीकंडक्टर ते दुर्मिळ खनिजांविषयी मोठी घोषणा, हे शेअर मालामाल करणार
  • फक्त 10 रुपये खर्च, घरातील मच्छरांचा लगेच होतो नायनाट, वाचा काय ट्रिक वापरायची?
  • Liquor Price : दारू महागली, आता 1000 रुपयांची बॉटल किती रुपयांना मिळणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in