• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Anjali Damania: दादा गेल्यानंतर शपथविधीची इतकी घाई का? यामागं कुणाचं राजकीय हित? अंजली दमानिया यांचा तो मोठा बॉम्ब

January 31, 2026 by admin Leave a Comment


Anjali Damania Big Statements: बुधवारी काळानं अजितदादांना हिरावलं. एका भीषण विमान अपघातात त्याचं निधन झालं. राज्यावर शोककळा पसरली. राष्ट्रवादी काँग्रेस, पवार कुटुंबिय अजूनही दु:खात असतानाच शुक्रवारी राजकीय घडामोडींना अचानक उकळी फुटली. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी काल वर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव दिला. त्यासोबतच राष्ट्रवादीची खाती पक्षाकडंच ठेवण्याची आग्रही मागणी केली. तर आज संध्याकाळी सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान अजून दुखवटा संपलेला नसताना इतकी घाई का करण्यात येत आहे असा सवाल राज्यभरातून विचारल्या जात आहे. त्याचवेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा या प्रकरणी मोठा बॉम्बगोळा टाकला आहे. त्यांनी या सर्व प्रकरणावरून भाजपवर तोंडसुख घेतले आहे.

शपथविधीची इतकी घाई का?

अजितदादा गेल्यानंतर शपथविधीची इतकी घाई का ? यामागे कुणाचं राजकीय हित दडलंय असा मोठा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील हे कधीही भाजपवासी व्हायला तयार आहेत असा खळबळजनक दावा त्यांनी केला. राष्ट्रवादी संपवली जात आहे. यानंतर शिवसेनेलाही दाबलं जाईल असा आरोप त्यांनी केला.

भाजपवर तो मोठा आरोप

भाजप राज्यातून सगळे प्रादेशिक पक्ष संपवण्याचा कट आखत आहेत. काही काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला, भाजप संपवणार आहे, असा खळबळजनक आरोपही अंजली दमानिया यांनी केला. वित्त खातं देवेंद्र फडणवीस स्वत:कडे का ठेवत आहेत? फडणवीस काय स्वतःला सुपरमॅन समजतात का? सगळी खाती फडणवीस हे स्वत:कडे ठेवणार तर मग इतर काय करणार ? अशी टीका अंजली दमानिया यांनी केली. राज्यात नैतिकता उरलेली नाही असं वक्तव्य पण दमानिया यांनी केले.

एकनाथ शिंदेंचे आजचे कार्यक्रम रद्द

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजचे कार्यक्रम रद्द केले. ते सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी संध्याकाळी उपस्थित राहणार असल्याचे समजते. लोक भवनात सायंकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आजच्या कराडमध्ये प्रचार सभा रद्द करत ते शपथविधीला उपस्थित राहतील. त्यामुळे आज संध्याकाळी शपथविधी सोहळा होणार आहे हे निश्चित मानल्या जात आहे. तर दुसरीकडे पार्थ पवार हे दीड तासापासून गोविंद बागेत होते. त्यांनी शरद पवारांची मनधरणी करत त्यांना शपथविधीसाठी आमंत्रण दिल्याचे समजते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : आयुष्यातील 3 असे प्रसंग जेव्हा खऱ्या मित्रांची ओळख होते, चाणक्य काय सांगतात?
  • Vastu Shastra : मोहरीच्या तेलाचा आणि तुरटीचा करा हा चमत्कारीक उपाय, तुमच्या आयुष्यात कोणतीच अडचण येणार नाही
  • इस्रायल बॅकफूटवर… नेतान्याहूंची माघार, लेबनॉनबाबत इस्रायलचा मोठा निर्णय
  • Vastu Shastra : सुख समृद्धीसाठी करा हे 7 सोपे उपाय, आयुष्यात पुन्हा कधी आर्थिक संकट येणार नाही
  • Dieting शिवाय कमरेचा घेर कसा कमी करायचा?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in