• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

America, Iran, Israel War : इराण सिजफायरसाठी तयार, पण दोन अटींमुळे ट्रम्प यांना घाम फुटला, थेट…

March 14, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज 15 दिवस आहे, दरम्यान या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. आखाती देशांकडून होणाऱ्या कच्च्या तेलाचा पुरवठा थांबल्यामुळे जागतील अनेक देशांवर इंधन टंचाईचं मोठं संकट निर्माण झालं आहे. यामधून भारत देखील सुटू शकलेला नाही. हे युद्ध आता थांबावं अशी जगभरातील देशांची इच्छा आहे. खुद्द अमेरिकेला देखील तसंच वाटत आहे. काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धासंदर्भात मोठं विधान केलं होतं. इराण कोणतीही अट न ठेवता सरेंडर झालं तर आम्ही हे युद्ध थांबवू आणि इराणमध्ये नव्या नेत्याची निवड करू असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. दरम्यान त्यावेळी आम्ही कधीही शरण येणार नाही असं म्हणत इराणने डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आता इराणने अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे.

आता युद्ध थांबवणं हे अमेरिका आणि इस्त्रायलच्या हातात नाही तर ते आमच्या हातात आहे असं इराणने म्हटलं आहे. इराणने हे युद्ध थांबवण्यासाठी आता अमेरिका आणि इस्त्रायलपुढे दोन अटी ठेवल्या आहेत. याबाबत इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे (IRGC) माजी कमांडर आणि एक्सपीडीएन्सी डिसर्नमेंट काउन्सिलचे सचिव मोहसेन रजई यांनी शनिवारी मोठं विधान केलं आहे. जर हे युद्ध थांबवायचं असेल तर आमच्या दोन अटी मान्य कराव्या लागतील, पहिली अट म्हणजे या युद्धात आमचं जेवढं नुकसान झालं आहे, त्याची नुकसान भरपाई आम्हाला द्यावी लागेल आणि दुसरी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे यानंतर आमच्यावर पुन्हा कधीही हल्ला होणार नाही याची गॅरंटी आम्हाला मिळावी अशी मागणी आता इराणने केली आहे.

मात्र इराणच्या या दोन अटी मान्य करणं हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी सोपी गोष्ट नसणार आहे. कारण आम्ही इराणचा पूर्ण परभाव करणार असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे, तसेच इराणने कोणतीही अट न ठेवता सरेंडर करावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. मात्र इराणकडून आता युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका आणि इस्त्रायलसमोर या दोन अटी ठेवण्यात आल्या आहेत, त्यामुळे ट्रम्प हे इराणची ही मागणी मान्य करणार का? हे पाहावं लागणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तिकडे जग युद्धाच्या चर्चेत गुंतलं अन् इकडे चीनने पाकिस्तानचा लचकाच तोडला, पाकला हादरवणारं असं काय घडलं?
  • MI vs RCB : आधी धोनी आता रोहित-विराट आयपीएलमधून OUT का? इंजरीबद्दल समोर आली महत्वाची अपडेट
  • सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार, नेमकं कारण काय?
  • Asha Bhosle last rites LIVE : महाराष्ट्राचा सूर हरपला…, आशा ताईंवर आज शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
  • US-Iran Tension : फक्त काही तास… पुन्हा युद्धाचा भडका, ट्रम्प भयंकर संतापले, जगात हाहाकार उडणार, आता..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in