• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

America, Iran, Israel war : इराणचा मित्र चीनला जबरदस्त धक्का; चायनाने स्वप्नातही विचार केला नसेल असं काही होईल

March 27, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. चीन आणि रशियाकडून या युद्धात इराणला थेट नसली तर अप्रत्यक्षपणे मोठी मदत होत आहे. मात्र आता इराणने असं काही केलं आहे, त्यामुळे चीन इराणवर नाराज होण्याची शक्यता आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद करण्याची घोषणा केली होती, त्यानंतर इराणने आपल्या मित्र राष्ट्रांसाठी स्ट्रीट ऑफ होर्मूज ओपन करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये चीनसह भारताचा देखील समावेश आहे. मात्र आता इराणने धक्कादायक निर्णय घेतला आहे. इराणने चीनची सरकारी कंपनी असलेल्या COSCO चे दोन मोठे तेल वाहतूक करणारे जहाज होर्मूज सामुद्रधुनीमधून वापस पाठवले आहेत.

इराणने आपला सर्वात जवळचा मित्र असलेल्या चीनलाच आता मोठा धक्का दिला आहे. इराणने चीनचे दोन जहाजं स्ट्रीट ऑफ होर्मूजमधून वापस पाठवले आहेत, त्यामुळे या जहाजांना यू टर्न घेण्याची वेळ आली आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर चीनकडून आखाती देशांकडून होणाऱ्या कच्च्या तेलाची बुकिंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर अचानक गुरुवारी चीनने पुन्हा एकदा कच्च्या तेलाची बुकिंग सुरू केली. हे दोन जहाजं कच्च तेल घेऊन चीनकडे निघाले होते, मात्र इराणने या जहाजांना स्ट्रीट ऑफ होर्मूजमध्ये अडवून त्यांना परत जाण्यासाठी भाग पाडलं.

चीनची नाराजी

दरम्यान इराणने घेतलेल्या या निर्णयामुळे आता चीन इराणवर नाराज होण्याची शक्यता आहे. युद्धामध्ये चीन ने जरी थेट इराणला समर्थन दिलं नसलं तरी देखील चीनकडून इराणला अप्रत्यक्ष मदत सुरूच आहे. तसा दावा अमेरिकेकडून देखील करण्यात आला आहे. मात्र आता इराणने आपल्याच मित्र राष्ट्राची जहाजं या बंदरात अडवली आहेत. इराणने या जहाजांना पुन्हा वापस जाण्यास भाग पाडलं आहे. हा चीनसाठी मोठा धक्का असणार आहे. यावर अजून तरी चीनकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ashok Kharat: अशोक खरात याचा जीव घाबराघुबरा, सर्व यंत्रणाच मागे लागल्या, ती मोठी अपडेट काय?
  • लग्नाआधी नवरीला बोलावलेलं, अशोक खरातचं आतापर्यंतच सर्वात घाणेरडं सत्य समोर
  • इराणला डोनाल्ड ट्रम्प यांचा अल्टिमेटम, थेट म्हटले, सहमत असो वा नसो आम्ही..
  • एकनाथ शिंदेंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव, ठाकरेंचे 8 खासदार फोडणार, नावही ठरली, मध्यरात्रीची मोठी घडामोड
  • जेठालाल ते बबिता.. ‘तारक मेहता..’च्या कलाकारांनी जमवली इतकी संपत्ती; कोण सर्वांत श्रीमंत?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in