• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ambani : गडगंज संपत्ती… यश… अंबानी यांचा सक्सेस मंत्र दडलाय या 5 पुस्तकात; श्रीमंत होण्यासाठी जाणून घ्या नावं ?

January 9, 2026 by admin Leave a Comment


रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. तसेच जगातील एक महत्त्वाचे उद्योजक आहेत. रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांची संपत्ती 87 अब्ज डॉलर पेक्षाही अधिक आहे. असं असलं तरी मुकेश अंबानी अत्यंत साधं आयुष्य जगतात. रोज सकाळी 5 वाजता उठतात. साडे सात वाजेपर्यंत जीममध्ये वर्क आऊट करतात. विशेष म्हणजे त्यांना पुस्तके वाचण्याचीही आवड आहे. आणि याच पुस्तकांमुळे त्यांना आज यश मिळालेलं आहे. तु्हीही ही पुस्तके वाचली तर मनाने श्रीमंत व्हाल.

मुकेश अंबानी नाश्त्यात पपयाचा ज्यूस घेतात. तसेच साऊथ इंडियन डिश खातात. मुकेश अंबानी त्यांच्या कुटुंबाला अत्यंत महत्त्व देतात. कुटुंबासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. सध्या ते त्यांच्या नातवाला पृथ्वीला अधिक वेळ देतात. माझा नातू माझ्यासाठी खूप भाग्यवंत आहे. जेव्हापासून तो जन्माला आला, तेव्हापासून आमची अधिकच भरभराट झाल्याचं अंबानी सांगतात.

मुकेश अंबानी यांच्या यशामागे काही पुस्तकांचाही हात आहे. कोव्हिडच्या काळात त्यांनी अधिकाधिक पुस्तके वाचली. या काळातील त्यांच्या आवडत्या पाच पुस्तकांची त्यांनी माहिती दिली होती. आज पुन्हा एकदा या पुस्तकांची माहिती घेऊया…

टेन लेसन फॉर दे पोस्ट पेंडेमिक वर्ल्ड – प्रसिद्ध पत्रकार फरीद जकारिया यांनी हे पुस्तक लिहिलंय. पूर्वीच्या काळात घडलेल्या आपत्तींचा कोव्हिड 19शी कसा संबंध आहे, याचं विवेचन या पुस्तकात करण्यात आलं आहे. पूर्वीच्या महामाऱ्याही कोरोनासारख्याच होत्या. त्याकाळी या संकटावर कशी मात करण्यात आली होती, याचा आढावा या पुस्तकातून घेतला आहे.

प्रिन्सिपल ऑफ डीलिंग विथ द चेंजिंग वर्ल्ड ऑर्डर – रे डेलियो यांनी हे पुस्तक लिहिलंय. हे पुस्तक अत्यंत रोचक आहे. यात गेल्या 500 वर्षाच्या इतिहासात मोठ्या देशांच्या यश आणि अपयशाबद्दल लिहिलं गेलंय. ज्याचा आपण कधीच विचार केला नाही अशा गोष्टी येणाऱ्या काळात होतील, असं या पुस्तकात म्हटलंय. हे पुस्तक धोरणकर्ते, उद्योजक, अधिकारी आणि तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

द रेजिंग 2020 : कंपनीज, कंट्रीज, पिपल एंड द फाईट फॉर अवर फ्यूचर – एलेक रॉस यांचं हे पुस्तक आहे. दशकांपासून सामाजिक समभ्यता समाजिक अनुबंधाने विणली गेली आहे. पण डीजिटल युगात त्यात मौलिक बदल होत आहे, असं या पुस्तकात दाखवण्यात आलं आहे.

2030 : हाऊ टुडेज ट्रेंड्स विल कोलाइड अँड रिशेप द फ्यूचर ऑफ एव्हरिथिंग – या पुस्तकात 2030च्या जगातील स्थितीच्या बाबत व्यावहारिक अंदाजाचे आकलन करण्यात आलं आहे.

बिग लिटिल ब्रेकथ्रोज : हाऊ स्मॉल, एव्हरिडे, इनोव्हेशन ड्राइव्ह ओव्हरसाईज्ड रिजल्ट्स – अंबानी यांचं हे पाचवं आवडतं पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक जोश लिंकर आहेत.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Meesho ला तेजीचे पंख! 1 दिवसात 14 टक्क्यांनी उसळला शेअर, गुंतवणूकदारांचा मोठा फायदा
  • लग्नाच्या 11 वर्षांनंतर करण पटेलचा घटस्फोट? पत्नीने सोडलं मौन, म्हणाली “लग्नाच्या वेळी..”
  • Joint Family मध्ये राहिल्यामुळे तुमचे मन शांत होते का?
  • सोन्याच्या कणांना वाहून नेणारी नदी, जिने लोकांना केले मालामाल…
  • Devendra Fadnavis | राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला आनंद

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in