• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Alia Bhatt: किती आणि कोणत्या मार्गांनी आलिया भट्ट कमावते कोट्यवधींची माया…, 550 कोटींची मालकीण…

March 15, 2026 by admin Leave a Comment


Alia Bhatt: बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर याची स्टुडेंट आलिया भट्ट आज यशाच्या उच्च शिखरावर आहे. आलिया हिने करण जोहर दिग्दर्शित ‘स्टूडेंट ऑफ द ईयर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, त्यानंतर आलिया हिने मागे वळून पाहिलंच नाही. आज आलिया बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘स्टूडेंट ऑफ द ईयर’ सिनेमानंतर अभिनेत्रीने ‘2 स्टेट्स’, ‘हायवेट, ‘डियर जिंदगी’, ‘राझी’, ‘गली बॉय’ आणि ‘गंगूबाई काठियावाडी’, यांसारख्या सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

सांगायचं झालं तर आज आलिया भट्ट हिचा वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. आलिया हिने फार कमी काळात इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं नाव मोठं केलं आहे. सोशल मीडियावर देखील आलिया हिच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. आलिया हिच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीकडे तब्बल 550 कोटी रुपयांची संपत्ती आहे. आलिया फक्त सिनेमांमधूनच नाही तर, अन्य मार्गांनी देखील कोट्यवधींची कमाई करते.

रिपोर्टनुसार, आलिया एका सिनेमासाठी तब्बल 10 ते 20 कोटी रुपये मानधन घेते… RRR सिनेमातील फक्त 20 मिनिटांच्या सीनसाठी तर आलियाने 9 कोटी रुपये मानधन घेतलं होतं… शिवाय आलिया वेब सीरीज आणि डिजिटल प्रोजेक्टसमार्फतही ती मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवते. विविध जाहिरातींच्या माध्यमातून देखील आलिया मोठी रक्कम कमावते.

आलिया हिचं स्वतःचं क्लोदिंग ब्रँड देखील आहे. ‘Ed-a-Mamma’ असं आलिया हिच्या ब्रँडचं नाव आहे. आलियाचा हा कपड्यांचा ब्रँड 2 ते 14 वयोगटातील मुलांसाठी पर्यावरणपूरक कपडे बनवतो. यातून लक्षणीय उत्पन्न देखील मिळते. सोशल मीडियावर आलिया कायम स्वतःच्या ब्रँडच्या पोस्ट शेअर करत असते.

आलिया हिच्या प्रॉपर्टीबद्दल सांगायचं झालं तर, फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील आलिया हिची कोट्यवधींची प्रॉपर्टी आहे. लंडन येथील कोवेंट गार्डन परिसरात आलिया हिचं एक घर आहे आणि त्या घराची किंमत 25 कोटी रुपये आहे. शिवाय मुंबई येथील वांद्रे येथे अभिनेत्रीचा बंगला आहे. बंगल्याची किंमत 32 कोटी रुपये आहे… अभिनेत्रीकडे अनेक आलिशान गाड्या देखील आहेत. ज्यामध्ये ऑडी क्यू7, बीएमडब्ल्यू 7 सिरीज, रेंज रोव्हर वोग, मर्सिडीज-बेंझ जीएलएस, ऑडी ए6 यांचा समावेश आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in